‘एसएफसी एनव्हायरमेंटलर टेक्नोलॉजीज’चा आयपीओ २७ ऑक्टोबर रोजी खुला होणार!

    21-Oct-2026   

 SFC Environmental Technologies IPO 
 
मुंबई, : ( SFC Environmental Technologies IPO) पर्यावरण तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘एसएफसी एनव्हायलमेंटल टेक्नॉलोजीज लिमिटेड’ या कंपनीतर्फे ६६७.५ कोटी उभारणार असल्याची घोषणा कंपनीचे अध्यक्ष संदीप असोलकर यांनी केली. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत आयपीओ खुला राहणार आहे. सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीचा प्रतिशेअर प्राईसबॅण्ड ३१३ ते ३३० रुपये इतका ठरविण्यात आला आहे. यानुसार, कंपनीचे एकूण भागभांडवल ३ हजार २३२.५ कोटी रुपये इतके असणार आहे. या आयपीओद्वारे कंपनी एकूण १५० कोटींचे नवे समभाग जाहीर करणार असून ५१७.५ कोटी किंमतीचे शेअर ऑफर फॉर सेलसाठी उपलब्ध असणार आहेत. विद्यमान गुंतवणूकदार आपला हिस्सा बाजारात विकणार आहेत.
 
‘एसएफसी एनव्हायरमेंटलर टेक्नोलॉजीज’च्या एका आयपीओ लॉटमध्ये एकूण ४५ शेअर असणार आहेत. या प्राईस बॅण्डवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ८५० रुपये गुंतववावे लागणार आहेत. ज्याची कमाल गुंतवणूक मर्यादा १ लाख ९३ हजार ५० इतकी असणार आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी अँकर बुक म्हणून हा आयपीओ २६ ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत बाजारात लिस्टींग होण्याची शक्यता आहे.( SFC Environmental Technologies IPO)
 
‘एसएफसी एनव्हायरमेंटलर टेक्नोलॉजीज’ची स्थापना २००५ साली झाली असून संदीप असोलकर आणि साकेतचंद्रसिंह प्रतापसिंह धंडोरिया हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. सांडपाण्याचे शुद्धीकरण, पुर्नवापर आणि घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रासाठी अभियांत्रिकी तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रासाठी कंपनी कार्यरत आहे. आर्थिक वर्ष २०२७च्या पहिल्या तिमाहीत सांडपाणी प्रक्रियेचा वाटा ४७ टक्के इतका होता. घनकचरा प्रक्रियेद्वारे ४० टक्के उत्पन्न मिळाले.
 
कंपनीने सादर केलेल्या प्रारूप विवरणपत्रानुसार, (डीआरएचपी) ऑगस्ट २०२६मध्ये एकूण ऑर्डर बूक ६४१ कोटी इतके होते. सांडपाणी शुद्धीकरण आणि पुर्नवापर प्रक्रियेत ५६१ कोटी रुपये तर घनकचरा प्रक्रियेवर ४५४.५ कोटी ऑर्डर्स आहेत. नव्या भांडवलाद्वारे कंपनी ४२.२ कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे, तर अन्य खेळत्या भांडवलासाठी ७५.९ कोटींचा वापर होईल. जून तिमाहीत कंपनीला दीड कोटी नफा झाला. कंपनीचे एकूण करवजावटीनंतर उत्पन्न १३३.९ कोटींवर पोहोचले आहे. गतवर्षी ते ६७.८ कोटी इतके होते. या आयपीओसाठी ‘आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस’, ‘जेएम फायनान्शिअल’ आणि ‘नुवामा वेल्थ मॅनेजमेंट’ हे मर्चंड बँकर आहेत.( SFC Environmental Technologies IPO)




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर