संघ शताब्दी वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता;गृहसंपर्क अभियान, युवा संमेलने, वैश्विक संवादातून संघाचा प्रवास अविरत सुरु!

    20-Oct-2026   


RSS Centenary Celebration 2026

 
मुंबई (RSS Centenary Celebration 2026) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शताब्दी वर्षपूर्ती सोहळ्याचा सांगता समारोप विजयादशमी २०२६ रोजी होत आहे. सन २०२५ ते २०२६ या वर्षभरात संघाने पंचपरिवर्तन, राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध व्यापक उपक्रम राबवले. या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने संघाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली, ज्यांची देशभरात चर्चा रंगली.
 
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजात राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी आणि जनसंवाद वाढवण्यासाठी गृहसंपर्क अभियान हाती घेण्यात आला. या मोहिमेत संघाच्या स्वयंसेवकांनी देशातील कोट्यवधी घरांना प्रत्यक्ष भेट दिली. प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधत संघाच्या शताब्दी वाटचालीची माहिती देण्यात आली आणि सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशीचा अवलंब आणि नागरी कर्तव्य या मूल्यांवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानामुळे शहरी व ग्रामीण भागात संघाचा जनाधार अधिक व्यापक झाल्याचे पाहायला मिळाले.(RSS Centenary Celebration 2026)
 
देशातील युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी भव्य युवा संमेलनांचे आयोजन करण्यात आले. या संमेलनांमध्ये लाखो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. युवकांना भारताचा गौरवशाली इतिहास, वर्तमान आव्हाने आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यात आली. व्यसनमुक्ती, शीलसंवर्धन, खेळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सदुपयोग या विषयांवर तरुणांशी संवाद साधण्यात आला.
 
शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विदेश दौरे केले. या विदेश दौऱ्यांचा मुख्य उद्देश परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना आणि हिंदूंना आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडून ठेवणे हा होता. या दौऱ्यांमध्ये सरसंघचालकांनी विविध देशांतील भारतीय समुदायाशी संवाद साधला, परिषदांमध्ये सहभाग घेतला आणि जागतिक स्तरावर 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार प्रभावीपणे मांडला. परदेशातील स्वयंसेवकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा यादरम्यान आढावा घेण्यात आला.(RSS Centenary Celebration 2026)
 
शताब्दी वर्षपूर्ती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील चार वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या होते. दिल्ली, बेंगलुरु, कोलकाता आणि मुंबई या चार ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून संघ विचारांची दिशा स्पष्ट करण्यात आली. या चार महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांनी संपूर्ण देशपातळीवर एक मोठा वैचारिक संदेश दिला गेला.
 
संघाच्या शताब्दी वर्षपूर्ती सोहळ्याने केवळ संघाच्या भूतकाळातील कार्याचा गौरव केला नाही, तर आगामी २५ वर्षांत म्हणजेच २०४७ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्य्याची शताब्दी साजरी करेल, तोपर्यंत देशाला एका समर्थ, आत्मनिर्भर आणि परमवैभवास नेण्याच्या दिशेने नवे संकल्प सोडले आहेत. विजयादशमी २०२६ रोजी होणाऱ्या या समारोप सोहळ्याने संघाच्या पुढील वाटचालीचा पाया अधिक मजबूत केला आहे.(RSS Centenary Celebration 2026)
 
'जॉईन आरएसएस'च्या माध्यमातून तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद
 
'जॉईन आरएसएस'द्वारे संघात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणाईचा ओघ पाहता, देशातील नवा युवा वर्ग अत्यंत उत्स्फूर्तपणे संघाच्या विचारांशी जोडला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल २४ हजारहून अधिक युवांनी संघाशी जोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मधील जानेवारी ते जुलै या कालावधीत 'जॉईन आरएसएस'च्या माध्यमातून ९,७१८ जणांनी संपर्क साधला होता. तर २०२६ मधील याच कालावधीत हा आकडा तब्बल २४,०८६ वर जाऊन पोहोचला आहे. संघाशी जोडण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांमध्ये तब्बल ६५ टक्के लोक ३० वर्षांखालील (जेन-झी) आहेत. त्याचबरोबर केवळ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच तब्बल ८,११७ जणांनी संघाशी जोडण्यासाठी नोंदणी केली आहे. हा वेग पाहता आगामी काळात हा आलेख आणखी उंचावणार असल्याचे उघड आहे. यंदाच्या शताब्दी वर्षात जेन-झी कडून मिळालेला हा प्रतिसाद हेच सिद्ध करतो की, देशातील तरुण पिढीला संघाचे राष्ट्र उभारणीचे आणि समाजसेवेचे कार्य जवळून जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता आहे.(RSS Centenary Celebration 2026)

आज रेशिमबागेत संघाचा विजयादशमी उत्सव
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरातर्फे यंदाचा विजयादशमी उत्सव मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सकाळी ७:४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हिंदू परंपरेतील सामूहिक शक्ती जागरणाचे हे पावन पर्व असून, यंदा संघाच्या शताब्दी वर्षपूर्ती सांगता वर्षामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सोहळ्याला दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, या वर्षीच्या विजयादशमी उत्सवात भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि मुंबईस्थित मध्य-पश्चिम भारतासाठीचे इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच हे विशेष निमंत्रित अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन आणि उद्बोधन स्वयंसेवक व उपस्थितांना लाभणार आहे.(RSS Centenary Celebration 2026)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर