_202610201847083407_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई, : (Marco Rubio Mumbai Visit)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने शाल देत रुबियो यांचा सन्मान केला. तसेच, मुंबईचा ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया व परिसराची माहिती त्यांना दिली.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुंबई आगमन होताच रुबियो यांचे गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने प्रस्थान झाले.(Marco Rubio Mumbai Visit)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मार्को रुबियो यांच्यात संवाद झाला. त्यानंतर दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. या माध्यमातून मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना करून देण्यात आली.(Marco Rubio Mumbai Visit)
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे उपस्थित होते. तसेच मुंबई विमानतळावर आगमनावेळी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू काकानूर, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांडे, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश मिसाळ, भारतातील अमेरिकेचे राजदूत, अमेरिकेचे महावाणिज्यदूत आणि दोन्ही देशांतील अन्य अधिकारी उपस्थित होते.(Marco Rubio Mumbai Visit)
मार्को रुबियो आणि श्रीमती रुबियो यांचे मुंबई, महाराष्ट्रात स्वागत करणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र-अमेरिका भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य वाढवून नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने आम्ही उत्सुक आहोत.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Marco Rubio Mumbai Visit)