_202610201854193129_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : (Jio Platforms IPO)देशातील अग्रगण्य टेलिकॉम कंपनी असलेल्या 'जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड' या कंपनीचा (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) आयपीओ एका नव्या विक्रमासाठी सज्ज आहे. साधारणतः ३० हजार कोटी २१३ कोटींच्या मुल्यासह देशातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून गणना यापूर्वीच झाली आहे. १० रुपये दर्शनी किंमत असलेल्या या आयपीओचा प्राईस ब्रॅण्ड १०६५ ते १११९ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान १२ शेअर्सचा एक लॉट खरेदी करावा लागणार आहे. आजपासून खुला झालेल्या आयपीओची विंडो २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत खुली राहणार आहे.
यापूर्वी एकूण २१२ संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अँकर बूकमध्ये जिओसाठी ८,१०९.८४ कोटींसाठी सुमारे अडीच लाख कोटींची बोली लावण्यात आली आहे. ज्यात ४९९.९८ कोटींसह एलआयसी आघाडीची गुंतवणूकदार संस्था ठरली आहे. त्यानंतर न्यू वर्ल्ड फंड ₹ ४८६.२७ कोटी, सिंगापूर सरकार ₹ ३४०.९३ कोटी, एसबीआय फोकस्ड फंड ₹ ३१५ कोटी, बीएनपी परिबा ₹ ३०३.२५ कोटी आदी गुंतवणूकदारांनी बोली लावली आहे. जिओचा ग्रे मार्केट प्रिमिअम वाढून २५२ रुपयांवर पोहोचला आहे.(Jio Platforms IPO)
नियमित किरकोळ गुंतवणूकदार, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार आदी श्रेणींसह रिलायन्सच्या पात्र शेअर होल्डर्ससाठी, जिओ आणि रिलायन्सच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोटा राखीव करण्यात आला आहे.
शेअर बाजाराला जिओकडून आशा!
जिओ आयपीओच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराला नवी झळाळी मिळण्याची शक्यता गुंतवणूक तज्ज्ञांची व्यक्त केली आहे. युरोपातील हिंसाचार, युद्धाचे सावट, सोन्याच्या किंमतीतील वाढ, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे गुंतवणूकदार होरपळलेल्या स्थितीत आहेत. आयपीओच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील गुंतवणूकदारांना जिओच्या आयपीओकडून आशा आहे.(Jio Platforms IPO)
आयपीओतून कर्जमुक्तीकडे
जिओवर सध्या सुमारे ६१ हजार कोटींचे कर्ज आहे. आयपीओ विक्रीतून जिओ सुमारे २७,५०० कोटींचे कर्ज फेडण्यावर भर देणार आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने जिओ वाटचाल ही गुंतवणूकदारांच्या पथ्य्यावर पडणार आहे.
जिओची कर्मचाऱ्यांना भावनिक साद
जिओने रिलायन्स समुहाच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूकदारांसाठी वेगळा कोटा तयार करुन या आयपीओसाठी गुंतवणूकीची संधी उपलब्ध करुन दिली असून त्यात ५४ रुपये प्रति शेअर इतकी सूट दिली आहे.(Jio Platforms IPO)