ठाकरेंचा दसरा मेळावा शरिया समर्थनासाठी : नितेश राणे

शिवाजी पार्कवरील मेळाव्याच्या टीझरवरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य;आजचा फ्रान्स आम्ही उद्याची मुंबई होऊ देणार नाही! Nitesh Rane on Uddhav Thackeray


 Nitesh Rane on Uddhav Thackeray 
 
 
 
मुंबई, : (Nitesh Rane on Uddhav Thackeray)विजयादशमीनिमित्त शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले. मेळाव्याच्या टीझरमधील ‘संविधान संरक्षणार्थ’ या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत त्यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच फ्रान्स आणि युरोपमधील आंदोलनांचा संदर्भ देत महाराष्ट्रात अशा प्रकारच्या परिस्थितीला थारा देणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
 
ठाकरे गटाच्या मेळाव्याचा अजेंडा संविधान संरक्षणाचा नसून शरिया समर्थनाचा असल्याचा आरोप राणे यांनी केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. मात्र, सध्याच्या ठाकरे गटाची भूमिका त्यापेक्षा वेगळी असल्याचा दावा त्यांनी केला.(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
राणे म्हणाले, “ठाकरेंच्या मेळाव्याच्या टीझरमध्ये संविधान संरक्षणार्थ हे वाक्य नाहीतर शरिया समर्थनात असे वाक्य आले पाहिजे. संविधान संरक्षणार्थ हा विषय ठाकरेंच्या मेळाव्याला बिलकुल सूट होत नाही. आजचा ठाकरेंचा मेळावा हा शरिया समर्थनात आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या दसरा मेळाव्यात उभ राहून हिंदुत्वाची पुकार दिली. हिंदुत्वाच्या आवाजाला मजबूत केलं. आत्ताचे ठाकरे त्या दसरा मेळाव्याला त्याच शिवाजी पार्कवर उभे राहून उद्या त्या उमर खालीद, सरजील उस्मान हे सगळे जे शरियाला मानणारे हे जे काही जिहादी आहेत त्यांना समर्थन करण्यासाठी हे ठाकरे टीका टिप्पणी करणार आहेत," असा थेट आरोप त्यांनी केला.
 
पुढे राणे म्हणाले, " ठाकरेंना या देशामध्ये शरिया कानून आणायचा आहे. संविधान संपवायचं आहे आणि उद्या त्याचे समर्थन करण्यासाठी हे उद्या बोलणार आहेत. तिथे काय आता तुम्हाला जय श्रीराम किंवा जय महाराष्ट्र हे नारे नाही तर तिथे आता सर तन से जुदाचे नारे ऐकायला मिळणार आहे. उद्या तिथे पाकिस्तान झिंदाबाद पण ऐकायला मिळाले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये कोणाच्याच रक्ताचा रंग भगवा राहिला नाही. सगळे हिरवेगार झालेले आहे. म्हणून तर बोलला ना शरियाच्या समर्थनात अल्लाहु अकबर म्हणत त्यांचा उद्याचा दसरा मेळावा होईल.”(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
देशाच्या विरोधात, राष्ट्राच्या विरोधात किंवा सनातन हिंदू धर्माच्या विरोधात आंदोलन झाल्यास पोलिसांनी कारवाई करावी, अशी भूमिका राणे यांनी मांडली. नितेश राणे म्हणाले, “आंदोलन जर देशाच्या विरोधात होत असेल, आंदोलन अगर राष्ट्राच्या विरोधात होत असेल, आंदोलन अगर सनातन हिंदू धर्माविरोधात होत असेल तर आमचे पोलीस बांधव त्याच्यावर कारवाई करणारच हे लक्षात ठेवा.
पुढे सोशलमिडीयावर चालणाऱ्या भारतात असे ट्रेंड चालविणाऱ्याना त्यांनी सुनावले. राणे म्हणाले, "असे ट्रेंड चालवायचे असेल तर फ्रान्समध्ये बघा काय चाललंय? मिलनमध्ये काय चाललंय? बाहेर युरोप आगीत जळतंय. कारण हे असेच ज्या बांगलादेश, रोहिण्यांना हे लोक दूध पाजत राहिले, आज तिकडे स्थानिकांवर हल्ले, जाळपोळ सुरु आहे. मारून टाकताय. कालचे फ्रांस आम्ही उद्याचे मुंबई व्हायला आम्ही देणार नाही. म्हणून राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकारची गरज असते. या सगळ्यांच्या आंदोलन करण्याची पद्धती पण बघा एकच आहे. फ्रान्समध्ये झालेले आंदोलन हे शिक्षणावर सुरू झाले.”(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर