केरळच्या पय्यानूरमध्ये सीपीएम कार्यकर्त्यांकडून स्वयंसेवकांवर हल्ला!

    02-Oct-2026   
  
 
Payyanur RSS Shakha Attack
 
मुंबई (Payyanur RSS Shakha Attack) : केरळमध्ये पुन्हा एकदा लाल दहशतीचा नंगानाच पाहायला मिळाला आहे. पय्यानूरच्या चेरपुझा खंडातील अरावमचल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शांततापूर्ण चाललेल्या शाखेवर सीपीएमच्या आणि डीवायएफआयच्या गुंडांनी भ्याड आणि हिंसक हल्ला चढवला. संघाच्या १०० व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या 'शाखा कार्यविस्तारा'ला पचवू न शकल्यामुळेच हा जीवघेणा आणि दहशतीचा कट रचण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. (Payyanur RSS Shakha Attack)
 
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी भाजप कार्यालयाजवळ नेहमीप्रमाणे शाखेचे कामकाज सुरू होते. या शाखेत लहान मुले खेळ व अन्य काही उपक्रमांत रमली होती. मात्र, वैचारिक विरोध सहन न होणाऱ्या डीवायएफआयचा स्थानिक नेता नितीन सिद्धार्थ आणि शरथ यांच्या नेतृत्वाखालील गुंडांच्या टोळीने या निष्पाप मुलांचीही पर्वा केली नाही! लहान मुलांच्या अंगावर धावून जात, हुज्जत घालत आणि परिसरात दहशत निर्माण करत या गुंडांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर थेट हल्ला चढवला. शाखेत खेळणाऱ्या लहान मुलांवरही हल्ला करण्यास न धजावणारे हे डावे गुंड नेमकी कसली 'क्रांती' करत आहेत, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. (Payyanur RSS Shakha Attack)
 
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सीपीएमच्या राजकीय आश्रयाखाली सुरू असलेल्या या गुंडगिरीचा जोरदार निषेध केला जात आहे. स्थानिक स्वयंसेवकांनी डाव्यांच्या या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत स्पष्ट इशारा दिला आहे की, "अशा भ्याड हल्ल्यांनी आणि दहशतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैचारिक व संघटनात्मक कार्य कधीही रोखता आले नाही आणि पुढेही येणार नाही. अशा निष्फळ प्रयत्नांमुळे स्वयंसेवकांचा राष्ट्रसेवेचा निर्धार अधिकच दृढ होईल." (Payyanur RSS Shakha Attack)
 
केरळमधील डाव्यांच्या या हिंसक आणि क्रूर मानसिकतेचा पर्दाफाश झाला असून, या हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने पुन्हा त्याच ठिकाणी शाखा लावल्याचे दिसून आले. (Payyanur RSS Shakha Attack)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर