मुंबई पोलिसांनी २४ तासांच्या आत गुंडांना बेड्या ठोकल्या; टायगर श्रॉफवरील हल्ल्याची गंभीर दखल, आरोपींची ओळख पटली!

सूत्रधारांचाही शोध घेणार, बॉलिवूडमधील कलाकारांनी घाबरण्याचे कारण नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 
 
Tiger Shroff Attack Case
 
मुंबई (Tiger Shroff Attack Case): अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणातील आरोपींची ओळख पातळी असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. केवळ हल्ला करणाऱ्या आरोपींचाच नव्हे, तर त्यांच्या पाठीशी असलेल्या सूत्रधारांचाही शोध घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी घटनेनंतर तातडीने तपास सुरू केला असून, रात्रीतूनच आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांच्याबाबत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. (Tiger Shroff Attack Case)
 
टायगर श्रॉफ यांच्यावरील हल्ल्यासह विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या घटनेला अत्यंत निंदनीय ठरवत त्यांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, मुंबई पोलीस ही व्यावसायिक आणि सक्षम यंत्रणा असून, गुन्हेगारांना जेरबंद केल्याशिवाय पोलीस स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Tiger Shroff Attack Case)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " ही घटना अत्यंत निंदनीय अशा प्रकारची आहे. पोलिसांनी तात्काळ या संदर्भातली कारवाई सुरू केली आहे. रात्रीतूनच आरोपींचे आयडेंटिफिकेशन करण्यात आले आहे. त्यांच्या संदर्भातले प्रमुख धागेदोरे हे पोलिसांना प्राप्त झालेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत या आरोपींना पोलीस शोधून काढतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील. एवढेच नाही तर यांच्या पाठीशी कोण आहेत त्यांनाही शोधून काढण्याचे काम पोलीस करतील. कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या घटना या टोलरेट केल्या जाणार नाहीत आणि मुंबई पोलीस निश्चितपणे या आरोपींना शोधून काढतील." (Tiger Shroff Attack Case)
पुढे मुख्यमंत्री फडणवीस ते म्हणाले, "पोलिसांना उघडपणे चॅलेंज वगैरे कोणी देऊ शकत नाही. हे डरपोक लोक आहेत. हे कुठेतरी लपून बसतात आणि तिथून अशा प्रकारच्या गोष्टी करतात. यांच्यात हिंमत नाहीये. हे एक प्रकारे जे भाड्याचे अशा प्रकारचे लोक आहेत, त्यांच्या आधारावर ते ऑपरेट करणारे लोक आहेत." या गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, राज्याबाहेरून आणि देशाबाहेरूनही त्यांचे कामकाज चालत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा टोळ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Tiger Shroff Attack Case)
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा टोळ्यांना घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. धमक्यांकडे दुर्लक्ष केले जात नसून, प्रत्येक धमकीची गंभीर दखल घेऊन त्यावर कारवाई केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत ते पुढे म्हणाले, "मी आश्वस्त करू इच्छितो, मुंबई पोलीस ही प्रोफेशनल पोलीस आहे. आजपर्यंत मुंबई पोलिसांनी दाखवून दिलंय की अशा प्रकारचे जे गुन्हेगार असतात, त्यांना मुंबई पोलीस जेरबंद केल्याशिवाय सोडत नाही. त्यामुळे निश्चितपणे याच्यावरही कारवाई होईल. कोणी घाबरण्याचं कारण नाही." (Tiger Shroff Attack Case)
 
टायगर श्रॉफ यांच्याशी स्वतःचे बोलणे झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले आहे. ते म्हणाले, "टायगर श्रॉफ यांच्याशी माझं बोलणं झालं. मी त्यांना हे सांगितलं की या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. आरोपी आम्ही शोधून काढू आणि त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात येईल." (Tiger Shroff Attack Case)
 
टायगर श्रॉफ यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना मागील काळातील घटनांची आठवण करून दिली. ते म्हणाले, "फार वेगाने कारवाई चाललेली आहे. पुढची कारवाई पोलीस सांगतील. खरं म्हणजे विरोधक जे टीका करतात त्यांनी मागे वळून बघितलं पाहिजे, थोडं अंतर्मुख झालं पाहिजे. कारण हे तेच लोक आहेत की ज्यांच्या काळामध्ये पोलिसांच्या मदतीने शासन स्पॉन्सर्ड अशा पद्धतीने देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला." (Tiger Shroff Attack Case)
 
याच संदर्भात मनसुख हिरेन यांच्या हत्येचा उल्लेख करत त्यांनी तत्कालीन परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, "एवढेच नव्हे, तर मला असं वाटतं की मनसुख हिरेन यांची हत्या ते कदाचित विसरले आहेत. मी एक गोष्ट सांगतो, मुंबई पोलीस ही प्रोफेशनल पोलीस आहे आणि मुंबई पोलीस निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करतील," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. कोणत्याही धमकीकडे दुर्लक्ष केले जाणार नसून, अशा गुन्हेगारी कृत्यांना सहन केले जाणार नाही, असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Tiger Shroff Attack Case)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर