मुंबई (Pratapgarh Durga Puja Clash) : उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील देहंगारी जमालपूर गावात दुर्गापूजा मंडपावर दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याचे निदर्शनास आले. सायंकाळच्या आरतीदरम्यान वाजवल्या जाणाऱ्या संगीताच्या आवाजावरून काही धर्मांध मुस्लिम लोकांनी आक्षेप घेतल्याने वादाला सुरुवात झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी असगर अली, अफजल अली, अफसर अली, हैदर अली, सरवर अली आणि फैजान अली या सहा आरोपींसह त्यांच्या घरातील काही अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pratapgarh Durga Puja Clash)
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास नवदुर्गा पूजा मंडपात सायंकाळची आरती झाल्यानंतर ही घटना घडली. मंडपात मुले भजने ऐकत होती, तर भाविकांना प्रसादाचे वाटप सुरू होते. त्यावेळी परिसरात राहणाऱ्या मुस्लिम समुदायातील काही लोकांनी संगीताच्या आवाजावर आक्षेप घेतला. या आक्षेपाचे रूपांतर वादात झाले. त्यानंतर शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. आरोपींनी काठ्या, विटा आणि दगडांनी भाविकांवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी देवी दुर्गेच्या मूर्तीची तोडफोड केली, नवग्रहासाठी सजवलेला चौथरा उलटवला आणि कलश, ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच जवळ उभ्या असलेल्या ई-रिक्षाचे नुकसान केले, असेही तक्रारीत म्हटले आहे. मंडपात उपस्थित असलेल्या एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला आणि तिचे कपडे फाडण्यात आल्याचाही आरोप आहे. तसेच जवळच्या मुस्लिम वस्तीत राहणाऱ्या काही महिलांनी घरांच्या छतावरून मंडपातील भाविकांवर विटा आणि दगड फेकल्याचेही वृत्त आहे.(Pratapgarh Durga Puja Clash)
पोलिसांनी असगर अली, अफजल अली, अफसर अली, हैदर अली, सरवर अली आणि फैजान अली या सहा आरोपींसह काही अज्ञात मुस्लिम महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. यापैकी असगर अली, अफजल अली, अफसर अली, हैदर अली आणि सरवर अली या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फैजान अली हा घटनास्थळावरून फरार झाला. या संघर्षात संतोष कुमार मिश्रा, मनोज कुमार मिश्रा, सरिता मिश्रा, सत्यम सरोज, लकी शर्मा, मुन्ना सरोज, मानकी सरोज, ममता सरोज आणि बसंती पटेल यांच्यासह अनेक हिंदू भाविक जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या पाच जणांना पुढील उपचारांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. काही आरोपीही जखमी झाल्याचे वृत्त आहे.(Pratapgarh Durga Puja Clash)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक