शालेय विद्यार्थिनींना धर्मांधरासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई! निष्पक्ष चौकशीसाठी ऑनलाइन निवेदनही दाखल

    19-Oct-2026   
 
 
Nagpur Symbiosis Law School Professor
 
मुंबई (Nagpur Symbiosis Law School Professor) : नागपूर येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमध्ये विद्यार्थिनींना आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारे संदेश पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थेतील प्राध्यापक अहमर अफाक याने विद्यार्थिनींना संदेश पाठवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि कुराण वाचण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर संबंधित प्राध्यापकाला चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शनिवारी विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन केले. विद्यार्थिनींची सुरक्षा, सन्मान आणि शैक्षणिक वातावरणाशी संबंधित हा गंभीर विषय असल्याचे सांगत अभाविपने प्रशासनाला निवेदन दिले आणि योग्य कारवाईची मागणी केली. (Nagpur Symbiosis Law School Professor)
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एका विद्यार्थिनीने प्राध्यापक अहमर अफाक कडून आलेले संदेश आपल्या वडिलांना दाखवल्यानंतर समोर आले. त्यानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांनी विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांशी संपर्क साधला. संघटनेच्या सदस्यांनी हा मुद्दा महाविद्यालय प्रशासनासमोर उपस्थित केला. तसेच नागपूरच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. आरोपांची चौकशी करून पुढील कारवाईबाबत शिफारस करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होऊन अहवाल येईपर्यंत संबंधित प्राध्यापकाला रजेवर पाठवण्यात आले आहे. संबंधित प्राध्यापकाने यापूर्वी हैदराबाद येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमध्ये काम केले होते. तेथील त्याच्या वर्तनासंदर्भातील आरोपांचीही ही समिती चौकशी करणार आहे.  (Nagpur Symbiosis Law School Professor)
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विविध संघटनांचे १५ ते १७ कार्यकर्ते विद्यापीठाच्या परिसरात पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी आंदोलक आणि प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणली. या चर्चेनंतर प्राध्यापकाला रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी सहाच्या सुमारास तक्रारदार विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांसह आणखी १५ ते २० जणांचा एक गट विद्यापीठाच्या परिसरात पोहोचला. त्या वेळी चौकशी समिती सुमारे १०० ते १२० विद्यार्थ्यांशी खुली चर्चा करत होती. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ प्रशासन आणि सहा ते सात जणांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक घडवून आणली. या शिष्टमंडळात तक्रारदार विद्यार्थिनीचाही समावेश होता.  (Nagpur Symbiosis Law School Professor)
 
बैठकीदरम्यान चौकशी समितीने तक्रारदारांना सर्व आरोपांची तपासणी केली जाईल आणि निर्धारित कालमर्यादेत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांना या प्रकरणातील तपासाच्या प्रगतीची माहिती दिली. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.  (Nagpur Symbiosis Law School Professor)
 
माजी विद्यार्थ्यांचे व पालकांचे निष्पक्ष चौकशीसाठी ऑनलाइन निवेदन
 
संस्थेशी संबंधित विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाकडे औपचारिक निवेदन सादर केले आहे. ‘सिम्बायोसिसची मूल्ये जपूया : गैरवर्तनाबाबत शून्य सहनशीलता’ या शीर्षकाने ऑनलाइन याचिकाही सुरू करण्यात आली आहे. या याचिकेत अहमर अफाक यांच्याविरोधातील आरोपांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, सिम्बायोसिस लॉ स्कूल, नागपूरशी संबंधित विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अन्य संबंधित व्यक्ती या नात्याने आम्ही परिसरातील अलीकडील घडामोडी, विद्यार्थी समुदायाने उपस्थित केलेल्या चिंता आणि संस्थेच्या प्रशासनाकडून वेळेवर व पारदर्शक माहिती दिली जात नसल्याच्या जाणिवेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करीत आहोत. संबंधित प्राध्यापकाने पाठवलेल्या लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावू शकणाऱ्या संदेशांबद्दलही निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  (Nagpur Symbiosis Law School Professor)
 
इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याची मागणी
 
महाविद्यालय प्रशासनाने आतापर्यंत कोणती कारवाई केली आहे, संबंधित विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलली आहेत आणि पुरावे जतन करण्यासाठी काय केले आहे, याची माहिती देण्याची मागणी निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक संदेश आणि महाविद्यालयाच्या परिसरातील घटनांचा समावेश असल्याने, लागू कायदे आणि विद्यापीठाच्या धोरणांनुसार सर्व संबंधित नोंदी जतन कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. संस्थेची उत्तरदायित्व निश्चित करणे आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करणे, या मागण्यांबरोबरच विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालकांनी साकिब रसूल भट या अन्य प्राध्यापकाच्या नियुक्ती, पार्श्वभूमी पडताळणी आणि संस्थेतील भूमिकेबाबतही चिंता व्यक्त केली आहे.  (Nagpur Symbiosis Law School Professor)
 
अभाविपची मागणी
 
चौकशी पूर्ण होईपर्यंत आवश्यक प्रशासकीय पावले उचलावीत आणि तक्रारदार विद्यार्थिनीची ओळख गोपनीय ठेवावी, अशी मागणी अभाविपने केली आहे. याशिवाय, तक्रारदार विद्यार्थिनी किंवा साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाणार नाही, याची खात्री करावी. त्यांना सूडबुद्धीने केल्या जाणाऱ्या कारवाईपासून संरक्षण द्यावे आणि चौकशीशी संबंधित माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, अशाही मागणी अभाविपने केली आहे.  (Nagpur Symbiosis Law School Professor)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर