अँकर बुकमध्ये जिओला ३० पट सबस्क्रिप्शन्स! संस्थांत्मक गुंतवणूकदारांकडून २.५ लाख कोटींची बोली

ब्लॅकरॉक आणि एसबीआय म्युच्युअल फंड्स सारख्या बड्या गुंतवणूकदारांचा सामावेश

    19-Oct-2026
 Jio Platforms IPO
 
मुंबई (Jio Platforms IPO) : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ १९ ऑक्टोबर रोजी बड्या संस्थात्मक गुंतवणूकदार कंपन्यांसाठी खुला झाला असून ज्यात ३० पटींनी सबस्क्राईब झाला आहे. या आयपीओत एकूण ८ हजार ११० कोटी रुपये अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्या तुलनेत अँकर गुंतवणूकदारांनी अडीच लाख कोटींची बोली लावली आहे. यामुळे ही बोली आयपीओ इतिहासातील आजवरची सर्वात मोठी बोली ठरली आहे. यात जगातील सर्वात मोठे असेट मॅनेजर्स, सोवरन वेल्थ फंड्स, भारतातील सर्व प्रमुख म्युच्युअल फंड्स, विमा कंपन्या, पेन्शन फंड्स आदींचा सामावेश आहे. (Jio Platforms IPO)
 
देशातील टॉप-१० फंड कंपन्यांनी केली गुंतवणूक
 
अँकर बुकमध्ये भारतातील सर्व प्रमुख दहा म्युच्युअल फंड कंपन्यांचा सामावेश आहे. ज्यात एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड आणि कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड आदी संस्थांचा सामावेश आहे.
 
देशातील महत्वाच्या विमा कंपन्याही यात आघाडीवर आहेत. एलआयसी, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, एसबीआय पेन्शन, एचडीएफसी पेन्शन आणि आयसीआयसी प्रुडेन्शल फंड्स अशा कंपन्यांनीही उत्सुकता दर्शविली आहे. जगभरातील सर्वात मोठे असेट्स मॅनेजर ब्लॅकरॉक, कॅपिटल ग्रुप, फिडेलिटी इनव्हेस्टमेंट, टी.रो.प्राईस, श्रोडर्स, जे.पी. मॉर्गन असेट्स मॅनेजमेंट, फ्रॅकलिन टेम्पलटन आदींनीही उत्सुकता दर्शविली आहे. तसेच जगविख्यात सोवरेन वेल्थ फंड्सनेही गुंतवणूकीस उत्सुकता दर्शविली आहे. (Jio Platforms IPO)
 
२१ ऑक्टोबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला होणार
 
जिओचा आयपीओ २१ ते २३ ऑक्टोबर या काळात खुला होणार आहे. ज्याद्वारे कंपनीला ३० हजार १८८ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या आयपीओत एकूण २७ कोटी समभागांची विक्री अपेक्षित असून प्रति समभाग मुल्य १,०६५ ते १११९ इतके ठरविण्यात आले आहे. ग्रे मार्केट प्रिमिअम अडीचशे रूपयांहून अधिक आहे. लिस्टींगनंतर भांडवली बाजार मुल्य १०.३० लाख कोटींवर पोहोचू शकते, अशी शक्यता आहे.
 
महत्वाच्या तारखा :
 
२१ ऑक्टोबर – आयपीओ खुला
२३ ऑक्टोबर – आयपीओ बंद
२६ ऑक्टोबर – शेअर अलॉटमेंट
रिफंड शेअर क्रेडिट – २७ ऑक्टोबर
लिस्टींग – २८ ऑक्टोबर
 
२७ कोटी फ्रेश इश्यू
 
आरपीएचनुसार, या आयपीओद्वारे रिलायन्स दहा रुपये दर्शनी किंमतीचे एकूण २७.५ कोटी शेअर बाजारात आणणार आहे. जिओ प्लॅटफॉर्मसमध्ये रिलायन्स जिओच्या टेलिकॉम आणि डिजिटल सेवा आदी श्रेणींचा सामावेश आहे.
 
देशातील सर्वात मोठा टेलिकॉम ऑपरेटर
 
जिओ प्लॅटफॉर्मस सद्यस्थितीत देशातील सर्वात मोठा टेलिकॉम ऑपरेटर आहे. ३० जून २०२६ रोजी कंपनीचा एकूण सबस्क्रायबर ५३.३ कोटी इतका आहे. ज्यात २८.४९ कोटी फाईव्ह जी युझर्स आहेत. म्हणजेच जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ग्राहकवर्ग आहे.
 
अँकर बूक म्हणजे काय?
 
अँकर बुक म्हणजे कुठल्याही बड्या कंपनीचा आयपीओ बाजारात येण्यापूर्वी मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या, परकीय गुंतवणूकदार आणि विमा कंपन्यांसाठी काही हिस्सा राखीव ठेवला जातो. अँकर गुंतवणूकदारांनी उत्सुकता दाखवल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण होते. (Jio Platforms IPO)
 
 




संबंधित मजकूर