सामाजिक व आध्यात्मिक संस्थांमध्ये परस्पर सहकार्य वाढावे - डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन

    19-Oct-2026   
 
Dr. Krishnagopalji
 
मुंबई (Dr. Krishnagopalji) : "विविध संस्था आपापल्या स्तरावर चांगले कार्य करत आहेत. या प्रयत्नांना परस्पर सहकार्याची जोड दिल्यास त्यांचा प्रभाव अधिक व्यापक होऊ शकतो. त्यामुळे धार्मिक व आध्यात्मिक संस्थांमध्ये सातत्याने संवाद आणि परस्पर सहकार्य असणे आवश्यक आहे. यामुळे सामाजिक समन्वय अधिक दृढ होईल आणि लोककल्याणाच्या प्रयत्नांना व्यापक स्वरूप प्राप्त होईल", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले.  (Dr. Krishnagopalji)
 
संघ शताब्दी वर्षपूर्ती निमित्त बिहारच्या दरभंगा येथे सामाजिक सद्भाव विचारगोष्ठी व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या गोष्ठीला डॉ. कृष्णगोपालजी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरभंगा विभागातील ४० हून अधिक धार्मिक व आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी, साधू-संत, महंत, संन्यासी आणि सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सनातन परंपरेतील जीवनमूल्ये, सामाजिक समरसता आणि समाजहितासाठी धार्मिक व आध्यात्मिक संस्थांची भूमिका यांवर विचारमंथन करणे तसेच सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, हा या गोष्ठीचा मुख्य उद्देश होता. (Dr. Krishnagopalji)
 
उपस्थितांना संबोधित करताना कृष्णगोपालजी पुढे म्हणाले, भारतीय समाजाला संस्कारित करणे, सांस्कृतिक चेतना टिकवून ठेवणे आणि लोककल्याणाची भावना जागृत करणे यामध्ये साधू-संतांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. सेवा, सदाचार, करुणा, आत्मानुशासन आणि लोककल्याण यांसारखी जीवनमूल्ये त्यांच्या कार्यातून प्रतिबिंबित होतात. ही मूल्ये आचरणात आणल्यास समाजातील सद्भाव, आत्मीयता आणि उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट होते. सर्व संस्थांनी नियमित बैठका आयोजित कराव्यात, परस्पर समन्वय वाढवावा आणि समाजहिताची कामे एकत्रितपणे पुढे न्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले. (Dr. Krishnagopalji)
 
संवादादरम्यान विविध मठ, मंदिरे आणि आध्यात्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापल्या संस्थांच्या कार्याची माहिती दिली. तसेच सामाजिक योगदान आणि भविष्यात एकत्रितपणे हाती घेता येणाऱ्या उपक्रमांविषयी विचार मांडले. या कार्यक्रमात संघाने मांडलेल्या पंचपरिवर्तनाच्या पाच प्रमुख बिंदूंवर भर देखील देण्यात आला. (Dr. Krishnagopalji)
 
या कार्यक्रमात आर्य समाज, पतंजली, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रामकृष्ण मिशन, आनंद मार्ग, दिव्य ज्योती जागृती संस्थान, संत निरंकारी मिशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, इस्कॉन, गायत्री परिवार, महर्षी मेंही आश्रम, बिहार राज्य धार्मिक न्यास परिषद, गुरुद्वारा समिती, जिल्हा दुर्गापूजा समन्वय समिती यांसह विविध धार्मिक व आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. (Dr. Krishnagopalji)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर