कधीही विसर्जित न होणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी काळाचौकीची दुर्गामाता

    18-Oct-2026
 

Kalachowki Durga Mata
 
मुंबई (Kalachowki Durga Mata): काळाचौकीतील रंगारी बदक चाळ येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. गुजराती, मराठी, बंगाली असे बहुभाषिक मंडळी या देवीला पाहण्यासाठी गर्दी करतात.
 
संकटात सर्वांचे रक्षण करणारी आणि सदैव भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणून तिची महाराष्ट्रभर ख्याती आहे.
काळाचौकीच्या या मातेचे कधीही विसर्जन होत नाही, हे या देवीचे खास वैशिष्टय आहे.
 
श्री समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवादरम्यान महिलांकडून मोठया प्रमाणात देवीची उपासना आणि नामस्मरण केले जाते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, खेळ पैठणीचा (होम मिनिस्टर), पाककला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लहान मुलांसाठी बडबड गीते, कॅरम, बुद्धिबळ, चित्रकला स्पर्धा, आणि मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जाते . 
सोमवार दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
यावर्षी मंडळाचे ७२ वे वर्ष असून पुरुषांसोबत महिलावर्गही मोठ्या हिरीरीने भाग घेताना दिसून येतात.
नुकताच, महिलांसाठी खेळ पैठणीचा म्हणजेच होम मिनिस्टर हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला, कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध मराठी/हिंदी सह-अभिनेते संजय कदम यांनी केले.
यावर्षी मंडळाचे अध्यक्ष- मंगेश सकपाळ, कार्याध्यक्ष-सिद्धेश शिंदे, सरचिटणीस-सिद्धेश पंडित, खजिनदार- सिद्धांत परब हे पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अशी माहिती मंडळाचे माध्यम प्रमुख रवि जाधव यांनी दिली. (Kalachowki Durga Mata)





संबंधित मजकूर