नवरात्रोत्सवात १०२ कुटुंबांची सनातन धर्मात घरवापसी; प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी कुटुंबियांचे पाय धुऊन केले स्वागत

    18-Oct-2026   
 
102 Families Return to Sanatan Dharma
 
मुंबई (102 Families Return to Sanatan Dharma) : छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्याच्या जैजैपूर परिसरातील गलगलाडीह गावात आयोजित श्रीमद् देवी भागवत कथेदरम्यान १०२ कुटुंबांनी सनातन धर्मात घरवापसी केली. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. अखिल भारतीय घरवापसी अभियानाचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी या कुटुंबांचे पाय धुऊन त्यांचे स्वागत केले. धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी समाजात अधिक जागरूकता निर्माण करण्याची तसेच सामूहिक प्रयत्न करण्याची गरज जूदेव यांनी व्यक्त केली. धर्म जागरण समन्वय, धर्म सेना, सेवा न्याय उत्थान फाउंडेशन आणि दिलीप सिंह जूदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, समाजप्रतिनिधी, महिला संघटनांच्या सदस्या आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.(102 Families Return to Sanatan Dharma)
 
काही ठिकाणी समाजसेवेच्या नावाखाली धर्मांतराच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप जूदेव यांनी केला. अशा प्रकारांमुळे वंचित आणि असुरक्षित समुदायांची सांस्कृतिक ओळख धोक्यात येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रलोभने किंवा दिशाभूल करून घडवून आणल्या जाणाऱ्या धर्मांतरांना रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.(102 Families Return to Sanatan Dharma)
 
सनातन हा भारताचा आत्मा आहे आणि त्याच्या अस्मितेवरील कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, असे जूदेव म्हणाले. घरवापसी अभियानाप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करताना, लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या श्रद्धेशी आणि सांस्कृतिक परंपरांशी पुन्हा जोडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिषासुरमर्दिनी स्वरूपातील माँ दुर्गेचा उल्लेख करत प्रबल प्रताप यांनी सनातन परंपरांचे रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी महिला व समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच, सक्ती जिल्हा धर्मांतरमुक्त करण्याचा सामूहिक संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.(102 Families Return to Sanatan Dharma)
 
सांस्कृतिक परंपरांचे सातत्य टिकवण्याचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, आपल्या पूर्वजांच्या श्रद्धेशी पुन्हा जोडले जाण्याची इच्छा असलेल्या सर्वांना त्यासाठी संधी मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील. विश्व हिंदू परिषदेचे आचार्य राकेशजी यांनी स्वामी श्रद्धानंद, स्वामी लक्ष्मणानंद, अशोकजी सिंघल आणि कुमार दिलीप सिंह जूदेव यांना आदरांजली वाहिली. सनातन धर्माच्या संरक्षणासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, समाजाने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी आणि धार्मिक परंपरांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.(102 Families Return to Sanatan Dharma)
 
धर्म जागरण समन्वयच्या महिला विभागाच्या प्रांत समन्वयक अंजू गबेल यांनीही महिलांना या अभियानाच्या समर्थनार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले. सक्ती जिल्हा धर्मांतरमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १०२ कुटुंबांनी सनातन धर्माशी आणि आपल्या पूर्वजांच्या समुदायाशी पुन्हा जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमादरम्यान धर्म सेनेतर्फे मोटारसायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी झालेल्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.(102 Families Return to Sanatan Dharma)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर