भारतीय जीवनमूल्यांच्या आधारे तरुणांना विश्वकल्याणाचे वाहक बनवा!

राष्ट्र सेविका समितिच्या वंदनीय प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांचे प्रतिपादनShantakka Indian Values

    17-Oct-2026   

Shantakka Indian Values 
 
मुंबई (Shantakka Indian Values) : महिलांनी आपल्या अंतर्गत शक्तीची ओळख करून घेत तिचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा. तसेच, तरुणांच्या विचारांत आणि आचरणात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत, भारतीय जीवनमूल्यांच्या आधारावर त्यांना विश्वकल्याणाचे वाहक बनविण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या वंदनीय प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांनी केले.(Shantakka Indian Values)
 
राष्ट्र सेविका समिति, नागपूर महानगराच्या वतीने आयोजित शस्त्रपूजन आणि विजयादशमी कार्यक्रम शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सिंधू एज्युकेशन सोसायटीज, महात्मा गांधी सेंटनियल, सिंधू हायस्कूल, जरीपटका नागपुर येथे संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई, नागपुर महानगर कार्यवाहिका करुणा साठे उपस्थित होत्या.(Shantakka Indian Values)
 
उपस्थितांना संबोधित करताना माननीय शांताक्का म्हणाल्या की, ज्या प्रकारे सात्त्विक आहार शरीराला निरोगी ठेवतो, त्याचप्रमाणे श्रेष्ठ विचार मन आणि बुद्धीला संस्कारित करतात. शाखांच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रनिष्ठ नागरिकांची निर्मिती होते. घातक आणि विषारी विचारसरणी असलेले 'दिमागी नक्षलवादी' समाजात गैरसमज पसरवून आणि तरुण पिढीला दिशाभूल करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींविषयी समाजाने सावध राहण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.(Shantakka Indian Values)
 
लक्ष्य फाउंडेशनच्या अध्यक्ष अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या की, अपत्य म्हणजे एक अक्षर असेल, तर आई हा कवितासंग्रह आहे आणि सैनिकाची आई म्हणजे महाकाव्य आहे. राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून प्रभावित झालेल्या प्रभुदेसाई यांनी या युवती भविष्यात समाजाला नेतृत्व प्रदान करतील, असा विश्वास व्यक्त केला.(Shantakka Indian Values)
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी शांताक्का आणि अनुराधा प्रभुदेसाई यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे, विजयादशमीच्या दिवशी राष्ट्र सेविका समिती आपल्या स्थापनेच्या ९०व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या कार्यक्रमात सेविकांनी योगासने, डम्बेल्स, तालयोग, दंड, गोफ, व्यायामयोग आणि घोष यांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितिच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी यांच्यासह समितीच्या अन्य अखिल भारतीय आणि क्षेत्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समाजातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. ‘वन्दे मातरम्’च्या संपूर्ण गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.(Shantakka Indian Values)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर