नवरात्रोत्सवातील प्रसादावर माशांचा कचरा टाकल्याचा आरोप; हैदराबादमध्ये धर्मांध मुस्लिम महिला अटकेत

    17-Oct-2026   


Hyderabad Navratri Prasad Incident

 
मुंबई : (Hyderabad Navratri Prasad Incident)हैदराबादमधील सैनिकपुरी परिसरातील आर. के. पुरम कॉलनीत नवरात्रोत्सवादरम्यान वितरित करण्यात येणाऱ्या प्रसादावर नूरजहाँ नामक महिलेने माशांचा कचरा टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून, त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.(Hyderabad Navratri Prasad Incident)
 
मिळालेल्या वृत्तांनुसार, परिसरातील श्री पोचम्मा मैसम्मा जयदुर्गा देवालय मंदिरात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाचा भाग म्हणून काही हिंदू महिला मंदिरासमोर भाविकांना प्रसादाचे वितरण करत होत्या. यासाठी त्यांनी रस्त्यावर भोजनवितरणाचे टेबलही लावले होते. हे टेबल मंदिराच्या समोर असलेल्या नूरजहाँ यांच्या घराबाहेरील रस्त्यावर मांडण्यात आले होते. आपल्या घराबाहेर भोजनवितरणासाठी टेबल लावण्यास नूरजहाँ यांनी आक्षेप घेतला. त्यावरून हिंदू भाविक आणि त्यांच्यात वाद झाला. यावेळी हिंदू महिलांनी, आपण दररोज याच ठिकाणी टेबल लावत असून, यापूर्वी कधीही असा आक्षेप घेण्यात आला नव्हता, असे सांगितले.(Hyderabad Navratri Prasad Incident)
 
आपल्या घराबाहेर सुरू असलेल्या हिंदू सणाच्या आयोजनामुळे नाराज झालेल्या नूरजहाँ यांनी घरातून माशांचा कचरा आणि मासे धुतलेले पाणी भोजनवितरणासाठी टेबल लावलेल्या ठिकाणी टाकल्याचा आरोप आहे. हिंदू भाविकांनी त्यांना याबाबत जाब विचारला असता, त्यांच्या ८६ वर्षीय आजी शैनबिया बीबी यांनीही बाहेर येऊन नूरजहाँ यांची बाजू घेतली. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, असे त्यांनी हिंदू भाविकांना सांगितल्याचे वृत्त आहे.(Hyderabad Navratri Prasad Incident)
 
या घटनेप्रकरणी मुंथा रमेश यादव यांनी नेरेडमेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६(२), २९९, ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यादव यांनी दावा केला की, गेल्या दहा वर्षांपासून या दोन्ही महिला अशाच प्रकारे हिंदूविरोधी वर्तन करत आहेत. हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि पूजाविधींविषयी त्या अवमानकारक वक्तव्ये करतात. हिंदूंच्या मूर्तिपूजेला ‘दगडांची पूजा’ असे संबोधणे, तसेच हिंदू सण आणि उत्सव वारंवार साजरे केले जात असल्याची खिल्ली उडविणे, असे प्रकार त्या करत असल्याचा आरोप यादव यांनी केला. याशिवाय, स्थानिक हिंदू महिलांना त्रास देणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीला धमकावणे, असे आरोपही त्यांनी केले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक एस. साई अविनाश तपासाचे नेतृत्व करत आहेत.(Hyderabad Navratri Prasad Incident)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर