विरोधकांना अराजकता माजवून सत्ता मिळवायची आहे! ; राजनाथ सिंह यांची इंडी आघाडीवर घणाघाती टीका

    16-Oct-2026   


Rajnath Singh on INDIA Alliance

 
मुंबई (Rajnath Singh on INDIA Alliance): विरोधकांना अराजकता माजवून सत्ता मिळवायची आहे. तरुणांना अराजकतेच्या राजकारणाकडे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असून, विरोधक सत्तापालटाची भाषा करत आहेत. अशी घणाघाती टीका केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंडी आघाडीवर केली. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सत्तापालटाच्या दाव्यांवरून विरोधक आणि इंडी आघाडीवर त्यांनी जोरदार निशाणा साधला.(Rajnath Singh on INDIA Alliance)
 
पत्रकार परिषदेला संबोधित करताना पुढे ते म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी भारतातील घटनात्मक संस्थांचा बळी दिला जाऊ शकत नाही. ही बाब समजून घेण्याची गरज आहे. खोटा आक्रोश व्यक्त करून, संस्थांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून आणि राजकीय संधिसाधूपणाच्या माध्यमातून भारताच्या विकासयात्रेला बाधा आणता येणार नाही. राहुल गांधी यांनी अडथळे निर्माण करणारे राजकारण करण्याऐवजी जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर करावा आणि आपल्या राजकीय भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे.(Rajnath Singh on INDIA Alliance)
 
देशातील तरुणांचा अराजकतेच्या राजकारणात प्याद्याप्रमाणे वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लोकांना बांगलादेशातील घटनांच्या धर्तीवर भारतात सत्तापालट हवा आहे. काही जणांना बांगलादेशातील परिस्थितीतून प्रेरणा मिळाल्याचे ते उघडपणे मान्य करतात, तर काही जण निर्लज्जपणे सरकार पाडण्याची मागणी करत आहेत. यावरून त्यांचा एकमेव अजेंडा लोकशाही संस्थांचा नाश करणे आणि देशात अशांतता निर्माण करणे हाच असल्याचे स्पष्ट होते. त्यांचा लढा निवडणूक सुधारणांसाठी नाही, तसेच तो एसआयआर किंवा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित नाही. देशातील तरुणांचे उज्ज्वल भविष्य हाही त्यांच्या लढ्याचा उद्देश नाही. उलट, देशात अराजकता पसरवून सत्ता बळकावण्याचा हा कट आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.(Rajnath Singh on INDIA Alliance)
 
इंदिरा गांधींच्या काळातील सरकारचा उल्लेख करताना ते म्हणाले की, १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला तुरुंगात डांबले होते. त्यांनी लोकशाहीला कैद केले होते. आज राहुल गांधी संविधान आपल्या खिशात ठेवून देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जी राहुल गांधी यांची काँग्रेस निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करते, त्याच काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर कठपुतळीप्रमाणे नियंत्रण ठेवले होते. १९९३ मध्ये काँग्रेस सरकारने निवडणूक आयोगात अचानक बदल केले. रातोरात दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना पदावरून हटवण्याची शिफारस केली होती, नवीन चावला यांनी निवडणूक आयोगातील संवेदनशील माहिती काँग्रेसच्या नेत्यांशी सामायिक केल्याचा आरोप गोपालस्वामी यांनी केला होता. हे अत्यंत गंभीर आरोप आहेत.(Rajnath Singh on INDIA Alliance)
 
राहुल गांधी यांच्या मतदारयादीसंबंधीच्या दाव्यांवर टीका
 
राहुल गांधी यांच्या मतदारयादीसंबंधीच्या दाव्यांवर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले, “राहुल गांधी यांनी एकदा ७० वर्षांची महिला ‘दुहेरी मतदार’ असल्याचा दावा केला होता. अनेकदा सामान्य नागरिकांना ‘बनावट मतदार’ ठरवून त्यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या स्वतःच्या पक्षाने मतदारयादीसंदर्भात कधीही कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. कारण, असे दावे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. आम्ही कधीही घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. हा आमचा स्वभाव आहे. आम्ही देशाच्या निवडणूक व्यवस्थेवर कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. घटनात्मक संस्थांची बदनामी करून जनतेची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केलेला नाही. आम्ही नेहमीच या देशातील जनता, संविधान आणि घटनात्मक संस्थांचा पूर्ण आदर केला आहे.”(Rajnath Singh on INDIA Alliance)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर