लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी काँग्रेस खासदाराच्या अटकेची अभाविपची मागणी

जेएनयूच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन; ‘लडकी हूं, लड सकती हूं’ ही काँग्रेसची घोषणा केवळ घोषणांपुरतीचABVP Protest at JNU

    16-Oct-2026   


ABVP Protest at JNU

 
मुंबई (ABVP Protest at JNU) : लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी काँग्रेसचे खासदार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) प्राध्यापक अंगोमचा बिमोल अकोइजाम यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) जेएनयू शाखेने नुकतेच रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने आणि निष्पक्षपणे कारवाई करावी, तसेच कायद्यानुसार अकोइजाम यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी अभाविपने केली. विद्यापीठाने त्यांना प्राध्यापकपदावरून बडतर्फ केल्याचेही वृत्त आहे.(ABVP Protest at JNU)
 
काँग्रेसकडून ‘लडकी हूं, लड सकती हूं’ अशी घोषणा दिली जाते. मात्र, पक्षाच्या खासदार आणि आमदारांशी संबंधित लैंगिक छळाच्या आरोपांच्या प्रकरणांमध्ये पक्षाकडून वेळोवेळी मौन बाळगले जात असल्याने त्यांची दुटप्पी भूमिका उघड होत असल्याचा आरोप अभाविपने केला. एका बाजूला महिला सुरक्षा आणि हक्कांबाबत भूमिका मांडायची, तर दुसऱ्या बाजूला गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या उत्तरदायित्वाबाबत मौन बाळगायचे, ही काँग्रेसची राजकीय मानसिकता असल्याची टीका संघटनेने केली.(ABVP Protest at JNU)
 
महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांचा पुरस्कार करणारा पक्ष स्वतःच्या खासदाराशी संबंधित गंभीर प्रकरणात स्पष्ट भूमिका घेत नसल्याबद्दल अभाविपने नाराजी व्यक्त केली. शैक्षणिक संस्थेने चौकशी करून कारवाई केली असून पोलिसांत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा प्रकरणाला केवळ राजकीय वाद म्हणून दुर्लक्षित करणे अस्वीकार्य असल्याचे अभाविपने म्हटले. या प्रकरणात काँग्रेसने स्पष्ट उत्तरदायित्व निश्चित करावे आणि कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईत कोणताही राजकीय दबाव अडथळा ठरू नये, अशी मागणीही करण्यात आली.(ABVP Protest at JNU)
 
काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेशी (एनएसयूआय) संबंधित व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचा दावा अभाविपने केला. शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थिनींची सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचे राजकीय पद, प्रभाव किंवा संघटनात्मक संबंध कायद्यानुसार उत्तरदायित्व टाळण्याचे कारण ठरू शकत नाहीत, असे संघटनेने स्पष्ट केले. दिल्ली पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय तपास करावा आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण सुनिश्चित करावे, अशी मागणीही अभाविपने केली.(ABVP Protest at JNU)
 
जेएनयू अभाविपचे अध्यक्ष मयंक पांचाळ म्हणाले, “महिलांची सुरक्षा केवळ घोषणा आणि भाषणांपुरती मर्यादित राहता कामा नये. ‘लडकी हूं, लड सकती हूं’ यांसारख्या अभियानांतून महिलांच्या हक्कांविषयी बोलणाऱ्या काँग्रेसने आपल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्येही स्पष्ट आणि उत्तरदायी भूमिका घेतली पाहिजे. जेएनयूतील विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींची विद्यापीठाच्या अंतर्गत समितीने चौकशी केली. त्यानंतर अंगोमचा बिमोल अकोइजाम यांना प्राध्यापकपदावरून बडतर्फ करण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तातडीने अटक करून निष्पक्ष तपास केला जावा, ही अभाविपची ठाम मागणी आहे. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर राजकीय सोयीनुसार वेगवेगळे निकष स्वीकारणे अजिबात मान्य नाही. विद्यार्थिनींना न्याय मिळालाच पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचे राजकीय पाठबळ कायद्याच्या मार्गात अडथळा ठरता कामा नये.”(ABVP Protest at JNU)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर