मुंबई (30-Foot Cockroach Effigy in Delhi) : दिल्लीतील रामलीला महोत्सवात यंदा रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांसोबतच तब्बल ३० फूट उंच झुरळाच्या पुतळ्याचेही दहन करण्यात येणार आहे. पितमपुरा येथे वार्षिक रामलीलेचे आयोजन करणाऱ्या श्री केशव रामलीला समितीने ही घोषणा केली आहे. झुरळ हे अस्वच्छता आणि घाणीचे प्रतीक असल्याने त्याचा पुतळा रावणाच्या सैन्यातील असुरांमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. स्वच्छ भारत आणि स्वच्छ दिल्ली अभियानांतर्गत स्वच्छतेचा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.(30-Foot Cockroach Effigy in Delhi)
समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार अशोक गोयल यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले. वाईटावर चांगल्याचा विजय हा रामलीलेतील पुतळ्यांच्या दहनामागील मुख्य संदेश आहे. त्याचबरोबर समाजात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी झुरळाच्या पुतळ्याचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(30-Foot Cockroach Effigy in Delhi)
दिल्लीमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर झुरळाच्या पुतळ्याच्या दहनाची घोषणा करण्यात आली आहे. या संघटनेने यापूर्वी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात आंदोलने केली होती. आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही संघटनेकडून करण्यात येत आहे. सीजेपीच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर झुरळाच्या पुतळ्याच्या दहनाची घोषणा झाल्याने या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, समितीच्या अध्यक्षांनी या उपक्रमाचा कोणत्याही राजकीय आंदोलनाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.(30-Foot Cockroach Effigy in Delhi)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक