_202610151924487126_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई, : (UDAN scheme Maharashtra)महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत सोलापूर-मुंबई आणि अमरावती-पुणे या दोन हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गांवर दोन्ही दिशांनी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सोलापूर आणि अमरावतीसारख्या शहरांना राज्यातील प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांशी थेट जोडण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.(UDAN scheme Maharashtra)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी. तसेच मोठ्या शहरांबरोबरच लहान आणि मध्यम शहरांमध्येही हवाई वाहतुकीचे जाळे विस्तारावे या उद्देशाने ‘उडान’ योजना राबविण्यात येत आहे. सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत आव्हानाधारित निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत प्रत्येक राज्याला चार हवाई मार्ग आणि दोन विमानतळ प्रस्तावित करण्याची संधी उपलब्ध आहे. याच संधीचा उपयोग करत महाराष्ट्रासाठी सोलापूर-मुंबई-सोलापूर आणि अमरावती-पुणे-अमरावती या मार्गांची निवड करण्यात आली आहे.(UDAN scheme Maharashtra)
“ महाराष्ट्रासाठी सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत सोलापूर-मुंबई आणि अमरावती-पुणे या हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे, ही आनंदाची बाब आहे. सोलापूर आणि अमरावतीसारख्या महत्त्वाच्या शहरांना मुंबई व पुण्याशी थेट जोडल्यामुळे विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. हवाई संपर्क म्हणजे केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणे नव्हे तर त्या शहरांमधील शिक्षण, रोजगार, व्यापार आणि विकासाच्या संधी जवळ आणणे होय. महाराष्ट्रातील अधिकाधिक शहरांना सक्षम हवाई वाहतुकीच्या जाळ्याशी जोडण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी प्रादेशिक हवाई संपर्काचा विस्तार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”(UDAN scheme Maharashtra)
- मुरलीधर मोहोळ
केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री