शारदा लिपीतील काश्मिरी भाषेतील पहिले नियतकालिक ‘शारदालोक’चे प्रकाशन

    15-Oct-2026   

Shardaloka magazine
 
मुंबई (Shardaloka magazine): भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत सप्तसिंधू फाउंडेशनने शारदा लिपीतील काश्मिरी भाषेतील पहिले नियतकालिक ‘शारदालोक’ प्रकाशित केले आहे. हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाच्या देहरा येथील सप्तसिंधू परिसरात या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सत प्रकाश बन्सल, हरियाणा साहित्य एवं संस्कृती अकादमीचे उपाध्यक्ष आणि सप्तसिंधू फाउंडेशनचे संचालक प्रा. कुलदीप चंद अग्निहोत्री तसेच विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अध्ययन केंद्रातील सहायक प्राध्यापक डॉ. किस्मत कुमार यांच्या हस्ते या नियतकालिकाचे लोकार्पण झाले.(Shardaloka magazine)
 
काश्मिरी भाषा अनेक शतकांपर्यंत शारदा लिपीत लिहिली जात होती. मात्र, धार्मिक आक्रमणांनंतर या भाषेवर पर्सो-अरबी नस्तालिक लिपी लादण्यात आल्याचा दावा करण्यात येतो. काश्मिरी भाषेची मूळ लिपी दूर झाल्यामुळे काश्मीरच्या मूळ सांस्कृतिक ओळखीवर परिणाम झाला, तसेच तेथील सांस्कृतिक सातत्यही मोठ्या प्रमाणात खंडित झाले, असे या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर नमूद करण्यात आले आहे.(Shardaloka magazine)
 
दीर्घ कालावधीनंतर ‘शारदालोक’च्या माध्यमातून काश्मिरी भाषा तिच्या मूळ शारदा लिपीत लिहिण्याच्या परंपरेला पुन्हा बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या नियतकालिकाच्या प्रकाशनाकडे एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम म्हणून पाहिले जात आहे. या नियतकालिकाचे संपादक डॉ. जयप्रकाश सिंह, सहसंपादक संजय पंडिता आणि कार्यकारी संपादक आदित्य अवस्थी आहेत.(Shardaloka magazine)
 
‘भारतीय ज्ञानपरंपरा समृद्ध करण्यामध्ये आणि तिचे जतन करण्यामध्ये शारदा लिपीची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. भारतीय ज्ञानपरंपरेतील अद्याप समोर न आलेल्या पैलूंपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणून ‘शारदालोक’ उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे,’ असे मत सप्तसिंधू फाउंडेशनचे संचालक प्रा. कुलदीप चंद अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.(Shardaloka magazine)
हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सत प्रकाश बन्सल म्हणाले, ‘शारदा लिपी जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने ‘शारदालोक’चे प्रकाशन महत्त्वाचे आहेच. त्याचबरोबर भारतीय ज्ञानपरंपरेचे सर्वांगीण आकलन करून घेण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचीही क्षमता या उपक्रमात आहे.’
 
विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अध्ययन केंद्रातील सहायक प्राध्यापक डॉ. किस्मत कुमार यांनी भाषेच्या जडणघडणीत लिपीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘लिपी भाषा आणि भावविश्व या दोन्हींची जडणघडण करते. ‘शारदालोक’ भारतीय भाषा आणि भावविश्व समृद्ध करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.’(Shardaloka magazine)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर