मुंबई, विशेष प्रतिनिधी - Nana Patekarमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘आठवणीतले नाना’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री वर्षा उसगावकर, दिग्दर्शक मेहुल कुमार, दिग्दर्शक संजय जाधव आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नाना पाटेकर याना लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली असल्याचे सांगितले.
मा.आशिष शेलार म्हणाले, देवेन्द्रजी प्रदेशाध्यक्ष होते, मी मुंबईचा अध्यक्ष होतो तेव्हा एका ठिकाणाहून कोणीतरी अभिनेता उभा करावा असा आमचा विचार होता. त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर नानांचं नाव आलं. आम्ही त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिल होत. तुम्ही माझे मित्र आहेत, मी तुम्हाला पचणार नाही, माझ्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता ,’ असं नाना म्हणाले होते. त्यानंतरही आमचा संवाद कायम सुरु राहायचा. माझा महाराष्ट्रासाठी वापर करा असं ते म्हणत असल्याची आठवण शेलारांनी सांगितली.Nana Patekar
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले कि, “नाना पाटेकर हे रागीट स्वभावाचे वाटायचे. पण नाना पाटेकर जेव्हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जायचे. तेव्हा त्यांचा अभिनय संपायचा आणि त्यांच्यातील माणूस जागा व्हायचा 2015 साली दुष्काळ पडला होता. तेव्हा मी सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो. तेव्हा नाम संस्थेच्या वतीने नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे सोलापुरात आले होते. मला समजताच मी नाना पाटेकरांना भेटण्याची विनंती केली. माझ्या विनंतीनंतर ते माझ्या कार्यालयात आले होते. माझ्या शासकीय निवासस्थानी येत त्यांनी माझ्यासोबत दुपारचे जेवण केले होते. आमच्या भरपूर गप्पा झाल्या. ती आमची पहिली भेट असलायचं मुंढे म्हणाले. आपल्या भावना व्यक्त करताना यावेळी तुकाराम मुंढे भावुक झाले होते.Nana Patekar
=================
नाना पाटेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलीवूडचा एकही मोठा स्टार आला नव्हता. आता नानांच्या शोकसभेला पण बॉलीवूड ने पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते.
नाना पाटेकर फार फटकळ होते, त्यांच्या फटकळपणाचा मलाही अनुभव आला. , एकदा एक पत्रकार सेटवर आलेला, त्यावेळी नानाही तिथे होते.. तेव्हा पत्रकाराने मला मुलाखतीसाठी विचारले. तेव्हा मी संपल्यावर करू असं सांगितलं. तितक्यात नाना पाटेकर माझ्याकडे आले, काय गं, तू पटकन हो काय म्हणालीस, त्या पत्रकाराला? स्वतःला महाग कर जरा, मी मनात म्हटलं, कसं महाग करायचं स्वतःला? त्यांचा तो सल्ला कळलंच नाही. त्यामुळे नानाबद्दलच्या आदरयुक्त भीतीने मी त्या पत्रकाराला सेटवर मुलाखत दिलीच नाही. घाबरुन त्या पत्रकाराला सेटवर मुलाखत दिलीच नाही..Nana Patekar varsha usgaonkar
वर्ष उसगांवकर, अभिनेत्री
-----------------------------------
मला हिंदी चित्रपटात नानाने आणलं. माझे पाय हिंदी चित्रपटात रोवणारा नानाच. 'यशवंत' सिनेमासाठी एक व्यक्ती मला भेटायला आला होता. तेव्हा मी त्याला नम्रपणे नाही सांगितलं. तर त्याने नानाने तुमचं नाव सुचवल्याचं सांगितलं. पण मी माझ्या मतावर ठाम होतो. तेव्हा त्याने माझं नानांशी बोलणं करून दिल. नानाने मला त्याच्या भाषेत समजावलं आणि चित्रपट साइन करायला लावला. नंतर नानाला मी कमी मानधन घेतल्याचं कळलं. तेव्हा त्याने निर्मात्यांची त्याच्या भाषेत शाळा घेतली. असा हा आमचा नाना होता. सदैव आमच्या स्मरणात राहील.Nana Patekar Shivaji Satam
शिवाजी साटम, अभिनेता
-----------------------------------------------------------
मी नानाला सोलो हिरो म्हणून जेव्हा क्रांतिवीर बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक वितरकांनी मला समजवण्याचा निर्णय घेतला, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. क्रांतिवीर प्रदर्शित झाला सगळ्यांचा अंदाज फोल ठरला. चित्रपट सुपरहिट झाला. नानाने खूप सहकार्य केलं होत. आताचे हिरो इतकंएकरूप होऊन काम नाही करू शकत. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर त्याने काम केलं होत. भारतातला उत्तम अभिनेत्यांपैकी एक नाना होता.Nana Patekar
मेहुल कुमार, दिग्दर्शक
------------------------------------------
मी नाना पाटेकर यांच्यासोबत 'प्रतिघात' मध्ये काम केलं होत. नाना थोडा उद्धट आणि तापट स्वभावाचा होता आणि एकदा मी त्याच्यावर खूपच रागावली होती. असे असूनही, जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचो , तेव्हा असे वाटायचे की जणू काही मागच्या पनावरुन संभाषण पुढे चालू झालाय. व्यसन नसलेला आणि इतका फिट माणूस अचानक कसा जाऊ शकतो यावर विश्वासच बसत नाहीये. नाना हा नानाच, असा नाना पुन्हा होणे नाही.Nana Patekar
रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री