भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत सर्वात मोठा हिस्सेदारी मिळवण्याचे लक्ष्य! अध्यक्ष आकाश अंबानी यांनी केली जिओच्या बहुप्रतिक्षित आयपीओची घोषणा

    15-Oct-2026

Akash Ambani
मुंबई : २०३१ पर्यंत भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत सर्वात मोठा हिस्सा हा जिओ प्लॅटफॉर्म्सकडे असेल असे लक्ष्य असल्याचे जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी ठेवले आहे. जिओच्या बहुप्रतिक्षित आयपीओपूर्वी त्यांनी ही माहिती दिली. केवळ रिचार्ज किंमती वाढविणे हेच एक महसुल वृद्धीचे लक्ष्य नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सेवा विस्ताराद्वारे महसुल वृद्धी शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थात रिचार्जच्या किंमतीतील वाढ हा पर्यायही आहे, असेही ते म्हणाले.
 
"प्रत्येक भारतीय घरांमध्ये आणि उद्योगाला उच्च दर्जाच्या परवडणाऱ्या डिजिटल सेवा उपलब्ध करुन देणे हे जिओचे ध्येय आहे, असे ते म्हणाले. दूरसंचार सेवा व्यतिरिक्त एआय, क्लाऊड कम्प्युटींग आणि इतर डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विस्तार कंपनी करत आहे. जागतिक डिजिटल व्यासपीठावर भारताला अग्रस्थानी नेण्याच्या उद्दीष्ट्य समोर ठेवून जिओ प्लॅटफॉर्म्स वाटचाल करित आहे," असेही ते म्हणाले.
 
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओच्या माध्यमातून ३० हजार २१३ कोटींचा निधी उभारण्याच्या तयारीत आहे. या आयपीओसोठी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि २३ ऑक्टोबर 2026 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कंपनीला कर्जमुक्त करण्याचे ध्येय यानिमित्ताने पुढे ठेवण्यात आले आहे. भारतातील डेटा टॅरिफमध्ये जिओचा वाटा 60 टक्क्यांहून अधिक आहे. यावरून देशातील दूरसंचार बाजारपेठेतील कंपनीचे महत्त्व अधोरेखित होते, असा दावाही त्यांनी केला. जिओ प्लॅटफॉर्म्सने आपल्या IPO साठी प्रति शेअर ₹1,065 ते ₹1,119 अशी किंमत निश्चित केली आहे.
जिओ इतिहास रचणार
 
१९७७साली जेव्हा रिलायन्सचा आयपीओ बाजारात आला, तेव्हा मरीन लाईन्स, चौपाट्यांवर भव्य रोषणाई करण्यात आली होती. तेव्हा मी १८ वर्षांचा होतो, आज पाच दशकांनी रिलायन्स जिओच्या आयपीओचा क्षण पाहतो तेव्हा आज महत्वाचा क्षण आहे. लिस्टींगनंतर जिओ एक मोठा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. - उदय कोटक, अध्यक्ष कोटक सिक्युरिटीज्
 
असा झाला जिओचा जन्म
 
२००९-१०मध्ये अमेरिकेहून सुट्ट्यांमध्ये घरी आल्यानंतर महाविद्यालयातील एका प्रकल्प तयार करित असताना इंटरनेट स्पीडचा मुद्द्यावरुन माझ्या आणि आकाशमध्ये चर्चा झाली. आपण वेगवान आणि सर्वांना परवडेल, अशी इंटरनेट सेवा आपल्या देशात का नाही? अमेरिकेत असताना अशी अडचण आली नाही, अशी चर्चा झाली. भारताला इंटरनेट कनेक्टीव्हीटी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आकाशने तेव्हा अधोरेखित केली होती आणि त्यानंतर आजचा दिवस आहे. - ईशा अंबानी, बिगर कार्यकारी संचालक

जिओने दाखल केले 7,220 पेटंट अर्ज

जिओ प्लॅटफॉर्म्सने भारतात आणि परदेशात एकूण 7,220 पेटंट अर्ज दाखल केले आहेत. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) 2025 च्या पेटंट कोऑपरेशन ट्रीटी क्रमवारीनुसार, जगातील आघाडीच्या 20 पेटंट अर्जदारांमध्ये स्थान मिळवणारी जिओ ही एकमेव भारतीय कंपनी आहे.





संबंधित मजकूर