मुंबई - Imran Khanआमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी देश सोडण्याची नोटीस बजावली आहे. 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या इम्रानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १० ऑक्टोबर रोजी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अभिनेत्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आले होते, परंतु नंतर त्याच रात्री त्याची सुटका करण्यात आली. दोन दिवसांनंतर, १२ ऑक्टोबर रोजी, मुंबई पोलिसांनी इम्रान खानविरोधात एफआयआर दाखल केला होता.
इम्रान भारतीय नागरिक नसतानाही आंदोलनात सहभागी झाल्यामुळे, मुंबई पोलिसांनी आता 'भारत सोडा' नोटीस बजावली आहे. त्यामुळे, इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. इम्रान खानचा जन्म १३ जानेवारी १९८३ रोजी अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील मॅडिसन येथे झाला. त्यांचे वडील, अनिल पाल, सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, त्यांची आई, नुझात खान, मानसशास्त्रज्ञ आहेत. इम्रानचे आजोबा कोलकात्याचे बंगाली होते, ज्यांनी एका ब्रिटिश महिलेशी लग्न केले होते. इम्रानचे वडील बंगाली हिंदू वंशाचे अँग्लो-इंडियन आहेत. त्याने मन्सूर खान यांच्यासोबत आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेतले. इम्रानची आई पश्तून आणि अरब वंशाची मुस्लिम महिला असून, ती एका चित्रपट कुटुंबातील आहे. ती दिग्दर्शक-निर्माता नासिर हुसेन यांची मुलगी, दिग्दर्शक-निर्माता मन्सूर खान यांची बहीण आणि अभिनेता आमिर खानची चुलत बहीण आहे. इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक आहे.Imran Khan
मुंबई पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी ४३ वर्षीय इम्रान खानविरोधात एफआयआर दाखल केला. १० ऑक्टोबर, शनिवारी मुंबईत झालेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी, आंदोलनादरम्यान सायंकाळी ५:३० च्या सुमारास त्याला ऑगस्ट क्रांती मैदानावर ताब्यात घेण्यात आले होते.रात्री ९ वाजता त्याची सुटका करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरही आंदोलक जमले होते. इम्रान खानसोबत त्याची प्रेयसी लेखा वॉशिंग्टन आणि चुलत भाऊ झैन मारी खान होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.Imran Khan
मुंबई पोलिसांनी इम्रान खान यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम २२३ (आदेशाचे उल्लंघन), १२६(२) (अवैध प्रतिबंध), १८९(२) (बेकायदेशीर जमाव), १८९(३) आणि १८९(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खुद्द पोलीस अधिकारीच तक्रारदार होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान मुंबईत ४०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले.Imran Khan