टिसाच्या वार्षिक सभेत १० सदस्य कंपन्यांचा गौरव; निर्यात, स्वदेशी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीची दखल

    14-Oct-2026
 
Thane Small Scale Industries Association
 
ठाणे (Thane Small Scale Industries Association): 'ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन'ची (टिसा) ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच टिसा हाऊस येथे पार पडली. यावेळी निर्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार, संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १० सदस्य कंपन्यांचा गौरव करण्यात आला. (Thane Small Scale Industries Association)
 
निर्यात क्षेत्रातील एएसपी असोसिएट्स, मेयर ऑर्गॅनिक्स, आकृती फार्मास्युटिकल्स, प्रिसाइज इलेक्ट्रिकल्स, मिलन लॅबोरेटरीज, मोतीलाल डिश्ड-एंड्स वर्क्स, कायझन एंटरप्रायझेस आणि शिंगरे इंडस्ट्रीज या आठ कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, स्वदेशी मोटर तंत्रज्ञान व संशोधनातील योगदानाबद्दल एस. एस. नातू प्लास्टिक्स अँड मेटल्स, तर अवजड अभियांत्रिकी आणि औद्योगिक प्रकल्पातील कामगिरीबद्दल फिल्स हेवी इंजिनिअरिंग यांचा गौरव करण्यात आला.  (Thane Small Scale Industries Association)
 
सभेत संस्थेच्या वर्षभरातील कामाचा आढावा घेण्यात आला. भिवंडी परिसरासाठी अग्निशमन सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केलेल्या पाठपुराव्याची दखल एमएमआरडीएने घेतल्याची माहिती देण्यात आली. उद्योगांवरील अनुपालनाचा भार कमी करणे, नियमांचे सुलभीकरण आणि प्रशासकीय विकेंद्रीकरण या विषयांवरही चर्चा झाली. लवकरच सुरू होणाऱ्या टिसा ॲपची माहिती उपस्थितांना देण्यात आली. (Thane Small Scale Industries Association)
 
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आशिष सिरसाट, मानद महासचिव भावेश मारू, माजी अध्यक्षा सुजाता सोपारकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी केले, तर नंदन खांबेटे यांनी आभार मानले. (Thane Small Scale Industries Association)





संबंधित मजकूर