मुंबई (Kurla Navratri Incident) : ऐन नवरात्रीच्या उत्साहात आणि पवित्र वातावरणाची सुरुवात होत असतानाच कुर्ल्याच्या गौरी शंकर चौक परिसरात नवरात्रोत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या ५१ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘तरुण मित्र मंडळ’च्या नवरात्रोत्सव मंडपावर काही धर्मांध मुस्लीम तरुणांनी अंडीफेक केल्याची संतापजनक घटना समोर आली. या प्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Kurla Navratri Incident)
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री १२:४० वाजायच्या सुमारास तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते नित्यानंद लोखंडे, कोहिनूर सकट, आदर्श गुप्ता, नितेश गुप्ता, आदेश पोटे आणि इतर १०-१२ मुले देवीच्या मंडपाबाहेर जागरणासाठी बसले होते. त्यावेळी मंडपापासून अंदाजे ५० मीटर अंतरावर असलेल्या ‘हंस रेसिडेन्सी’ इमारतीच्या गेटमधून तीन इसम अचानक पळत बाहेर आले. (Kurla Navratri Incident)
त्यातील एक काळा टी-शर्ट घातलेला तरुण पुढे होता, तर त्याचे मागे दोन जण पळत होते. पाठीमागे पळत असलेल्या एकाच्या हातात अंडे होते. त्याने पुढे पळणाऱ्या तरुणाला सोडून जाणूनबुजून देवीच्या मंडपाच्या दिशेने अंडे फेकून मारले. हे अंडे थेट मंडपाच्या गेटबाहेर पार्क केलेल्या मोटरसायकलच्या इंजिनवर येऊन आदळले, असा आरोप तक्रारदार नित्यानंद लोखंडे यांनी केला आहे. (Kurla Navratri Incident)
अशी माहिती आहे की, हा प्रकार पाहताच कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपी पळून ‘हंस रेसिडेन्सी’ इमारतीजवळ गेले. कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला असता, "आम्ही मित्राचा वाढदिवस साजरा करत असून एकमेकांना अंडी मारत होतो," अशी उत्तरे त्यांनी दिली. जेव्हा कार्यकर्त्यांनी मंडपावर अंडे कुणी फेकले असा जाब विचारला, तेव्हा त्यांनी उलट वाद घालून परिसरात जोरजोरात आरडाओरडा सुरू केली. (Kurla Navratri Incident)
त्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मंडळाचा कार्यकर्ता कोहिनूर सकट याने अझफ करीम खान यानेच मंडपावर अंडे फेकून मारल्याचे खात्रीपूर्वक ओळखले. तसेच, हुज्जत घालून वाद घालणाऱ्या इतर दोघांची नावे झैद इक्बाल मेहत्तर आणि अब्दुल रेहमान फारूख गोलंदाज असल्याचे उघड झाले. (Kurla Navratri Incident)
याप्रकरणी विनोबा भावे पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये कलम २९८ आणि ३(५) अंतर्गत कायदेशीर गुन्हा नोंदविला आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र वातावरणात धार्मिक भावना दुखावण्याच्या या कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. (Kurla Navratri Incident)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक