मुंबई, :(Voter List Claims and Objections) मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून आता नागरिकांना दि. २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे.
दरम्यान, पूर्वीच्या वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्याचा २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करता येतील. तसेच नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.(Voter List Claims and Objections)
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच आवश्यकतेनुसार हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ महत्वाची आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपले दावे व हरकती विहित वेळेत सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.(Voter List Claims and Objections)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....