शांताराम गोवळकर यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न

    13-Oct-2026   

Shantaram Govalkar 80th Birthday
 
मुंबई (Shantaram Govalkar 80th Birthday) : समाजातील सर्वच व्यक्तींनी समाजोपयोगी व संघटनात्मक समाजकार्य केल्यास त्या त्या समाजाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत आमदार व माजी समाजकल्याण राज्यमंत्री विजयभाई गिरकर यांनी केले. रोहिदास समाज पंचायत संघ व आदर्श शिक्षण समितीचे तहहयात विश्वस्त समाजसेवक शांताराम गोवळकर यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मुलुंड येथे आयोजित सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात ते बोलत होते.
 
आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या समाजाला मोठे करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने महापुरुषांच्या कर्तबगारिंची आठवण करायला हवी. त्यांचे आदर्श समोर ठेवूनच तसे कार्य केल्यास समाजात बदल नक्कीच होईल, असेही भाई गिरकर पुढे आपल्या भाषणात म्हणाले व याप्रसंगी त्यांनी गोवळकरांच्या समाजकार्याची प्रशंसा केली.(Shantaram Govalkar 80th Birthday)
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी संदेश गोवळकर यांनी वडील शांताराम गोवळकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला; उपस्थित सर्व पाहूण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शांताराम गोवळकर यांच्या काही आठवणीना उजाळा देण्यासाठी आयकरचे निवृत्त डेप्युटी कमिशनर हरीश केळकर , कुडाळचे नायब तहसीलदार प्रदीप पवार, संतोष भोईर, रोहिदास समाज पंचायत संघाचे अध्यक्ष मयुर देवळेकर, राजाराम पवार, अतुल धयाटकर व आदर्श शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष रामचंद्र जाधव आदींची भाषणे झाली .(Shantaram Govalkar 80th Birthday)
 
यावेळी 'सा. प्रकट महाराष्ट्र व यू - ट्युब वृत्तवाहिनीच्या' वतीने स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन शांताराम गोवळकर यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर नेहा धयाटकर ही चाटर्ड अकाउंटिंगची परीक्षा उत्तम मार्कांनी पास झाल्याबद्दल भाई गिरकर यांच्याहस्ते तिचा सत्कारही करण्यात आला. संकल्प गोवलकर यांनी उपस्थित पाहुणे व सर्व शुभे शुभेच्छूकांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम दळवी यांनी केले.(Shantaram Govalkar 80th Birthday)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर