कोकणात सागरी कासवांची वीण लवकर; रत्नागिरीत 'या' किनाऱ्यावर आढळले घरटे

    13-Oct-2026

sea turtle nesting

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोकण किनारपट्टीवर यंदाच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे (sea turtle nesting). रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर ७ ऑक्टोबर रोजी सागरी कासवाचे पहिले घरटे आढळून आले (sea turtle nesting). कांदळवन कक्षाच्या दक्षिण कोकण विभागातील वनकर्मचाऱ्यांनी या घरट्याचे इन-सिटू पद्धतीने संवर्धन केले आहे (sea turtle nesting). नैसर्गिक अधिवासातच घरट्याचे संरक्षण करण्याच्या या पद्धतीमुळे कासवांची अंडी सुरक्षित ठेवण्यास मदत होते. (sea turtle nesting)
 

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. यामध्ये प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. वन विभागाच्या कांदळवन कक्षाच्या नोंदीनुसार, रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरीतील सुमारे ३० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २० किनाऱ्यांवर सागरी कासवांची घरटी आढळतात. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरच्या सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर महाराष्ट्रातील सर्वाधिक घरटी नोंदवली जातात. गेल्या वर्षी या किनाऱ्यावर १४५ घरटी आढळली होती. यंदाच्या हंगामातील पहिले घरटेही याच किनाऱ्यावर सापडल्याने कासवांच्या विणीच्या हंगामाची सुरुवात झाली आहे.
 
गुहागरच्या किनाऱ्यावरील घरटे हे कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाच्या वनकर्मचाऱ्यांनी इन-सिटू पद्धतीने संवर्धित केल्याची माहिती कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाचे विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी दिली. सागरी कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी इन-सिटू आणि एक्स-सिटू या दोन संवर्धन पद्धती वापरल्या जातात. इन-सिटू म्हणजे मूळ जागीच संवर्धन. या पद्धतीत कासवाने नैसर्गिकरीत्या तयार केलेले घरटे त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवले जाते. घरट्याभोवती जाळीचे कुंपण उभारून कोल्हे, कुत्रे यांसारख्या प्राण्यांपासून अंड्यांचे संरक्षण केले जाते. अंडी दुसऱ्या ठिकाणी हलवली जात नसल्याने त्यांचा नैसर्गिक अधिवास कायम राहतो. गुहागरच्या किनाऱ्यावर आढळलेल्या घरट्याचे अशाच पद्धतीने संवर्धन करण्यात आले आहे. कारण ते भरती रेषेच्या पुढे आहे. ज्याभोवती जाळीचे कुंपन करुन हे घरटे संवर्धित करण्यात आले आहे.

कालावधीत बदल
साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांच्या विणीचा हंगाम असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत कासवांची घरटी आढळण्याचा कालावधी प्रामुख्याने जानेवारी ते मार्चदरम्यान केंद्रित झाल्याचे निरीक्षण आहे. मात्र, यंदा जवळपास दोन ते तीन महिन्यांपूर्वीच सागरी कासवाचे घरटे आढळून आले आहे. त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाचे हे संकेत आहेत की यंदा सागरी कासवांची घरटी लवकरच होणार आहेत, हे येत्या काळात पाहावे लागेल.





संबंधित मजकूर