मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे इचथियोफिस कुळातील देवगांडुळाचा अल्बिनो रंगप्रकार आढळून आला आहे (Rare Albino Caecilian). वन्यजीव निरीक्षकांना हा असामान्य रंगाचा उभयचर दिसून आला (Rare Albino Caecilian). सर्वसाधारणपणे गडद रंगात आढळणाऱ्या या जमिनीत राहणाऱ्या उभयचराचा फिकट, पिवळसर-गुलाबी रंग लक्षवेधी ठरला आहे (Rare Albino Caecilian). या नोंदीमुळे सह्याद्रीच्या जैवविविधतेतील दुर्मीळ आणि कमी अभ्यासल्या गेलेल्या जीवांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. (Rare Albino Caecilian)
गांडूळासारखे दिसणारे देवगांडूळ हे उभयचर जीव आहेत.देवगांडूळ हा गांडुळासारखा दिसतो. मात्र, ते गांडूळ नसून एक उभयचर प्राणी आहे. गांडूळ हे अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेले), तर देवगांडूळ हे पृष्ठवंशीय (कणाधारी) असते. त्यांचे शरीर लांबट, गुळगुळीत आणि वलयांकित असते. जमिनीखाली किंवा ओलसर मातीमध्ये राहण्याच्या सवयीमुळे या प्राण्यांचे निरीक्षण करणे तुलनेने कठीण असते. त्यामुळे त्यांच्या स्थानिक वितरणाविषयी आणि जीवनशैलीविषयीची माहितीही मर्यादित आहे. यामधील इचथियोफिस ही दक्षिणपूर्व आशिया, दक्षिणी फिलीपिन्स आणि पश्चिमेकडील इंडो-ऑस्ट्रेलियन द्वीपसमूहात आढळणाऱ्या देवगांडूळाचे कुळ आहे.
देवगांडुळांच्या अनेक प्रजातींच्या शरीराचा रंग गडद तपकिरी, काळसर किंवा राखाडी असतो. मात्र, मांगेली येथे आढळलेल्या सरीसृपाच्या शरीरावर फिकट पिवळसर-गुलाबी छटा दिसत आहेत. मांगेली येथे रात्री फेरीसाठी गेलेले सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत, विशाल सडेकर, अभिषेक राणे, संजय नाटेकर, गौरेश राणे, संजय सावंत आणि दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांना या उभयचराचे दर्शन झाले. तो पूर्णपणे पांढरा असून डोळे देखील लाल आहेत. हा अल्बिनिझम हा रंगद्रव्यांच्या निर्मितीशी संबंधित आनुवंशिक बदल आहे. यामध्ये शरीरातील मेलेनिन या रंगद्रव्याचे प्रमाण अत्यल्प किंवा अनुपस्थित असू शकते. मात्र, निसर्गात दिसणारा प्रत्येक फिकट रंगाचा प्राणी अल्बिनो असेलच असे नाही. ल्युसिझमसारख्या इतर रंगवैशिष्ट्यांमुळेही प्राण्यांचा रंग सामान्यपेक्षा वेगळा दिसू शकतो.सह्याद्रीतील दमट जंगलांमध्ये आणि ओलसर अधिवासांमध्ये देवगांडुळांसारखे जमिनीखाली राहणारे उभयचर पर्यावरणीय साखळीचा महत्त्वाचा भाग आहेत.