महाराष्ट्रात युरोपियन निळपंखच्या संख्येचा उद्रेक!

    13-Oct-2026

European Roller


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र खास करुन कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात युरोपियन निळपंख (European Roller) या स्थलांतरित पक्ष्याचे मोठ्या संख्येने दर्शन घडत आहे (European Roller). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत या पक्ष्यांच्या नोंदी वाढल्या असून, पुण्यासह बेंगळुरू, चेन्नई आणि केरळमधूनही अशाच स्वरूपाचे अहवाल समोर येत आहेत (European Roller). मध्य आशियात प्रजनन करणारा हा पक्षी भारतामार्गे आफ्रिकेकडे स्थलांतर करतो (European Roller). मात्र, यंदा भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, त्याच्या संख्येत दिसणारी असामान्य वाढ पक्षीनिरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. (European Roller)
 
महाराष्ट्रात वर्षभर आढळणाऱ्या निवासी पक्ष्यांपासून ते हिवाळ्यात लांबचा प्रवास करून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांपर्यंत विविध प्रकारचे पक्षी दिसतात. यांपैकी काही पक्षी स्थलांतराच्या प्रवासात भारतात अल्पकाळ थांबतात आणि त्यानंतर पुढील मुक्कामाच्या दिशेने रवाना होतात. अशा पक्ष्यांना ‘पॅसेज मायग्रंट’ अर्थात मार्गस्थ स्थलांतरित पक्षी म्हणतात. युरोपियन निळपंख हा त्यांपैकीच एक आहे. युरोपियन निळपंखाचे भारतीय निळपंखाशी रंगरूपाच्या बाबतीत काहीसे साम्य असले तरी ते दोघही निरनिराळे पक्षी आहेत.
 
युरोपियन निळपंखच्या दोन प्रमुख उपप्रजाती आहेत. त्यांपैकी एक युरोप आणि उत्तर आफ्रिकेत प्रजनन करते, तर दुसरी मध्य आशियातील प्रदेशांत प्रजनन करते. मध्य आशियात प्रजनन करणारे हे पक्षी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास स्थलांतराच्या प्रवासाला निघतात. भारतातून मार्गक्रमण केल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास अरबी समुद्रावरुन उड्डाण करुन आफ्रिकेच्या दिशेने होतो. राजस्थान आणि गुजरात हे त्याच्या प्रवासातील महत्त्वाचे प्रदेश मानले जातात. मात्र यंदा या पक्ष्यांचा ओघ दक्षिण भारताकडे प्रामुख्याने दिसत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रात युरोपियन निळपंखच्या मोठ्या संख्येने नोंदी होत आहेत. महाराष्ट्राबरोबरच बेंगळुरू, चेन्नई आणि केरळमधूनही या पक्ष्यांच्या उपस्थितीचे वृत्त समोर येत आहे. एरवी एवढ्या मोठ्या संख्येने हे पक्षी दक्षिण भारतात स्थलांतर करत नाहीत. विविध प्रदेशांतून एकाच काळात अशा नोंदी येत असल्याने यंदाच्या स्थलांतरात काहीतरी असामान्य घडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

स्थलांतर मार्गात अडथळा ?
गुजरात आणि राजस्थान हे युरोपियन निळपंख पक्ष्यांच्या मार्गस्थ स्थलांतराच्या प्रवासामधील नियमित ठिकाणे आहेत. मात्र यावर्षी दक्षिण भारतात या पक्ष्यांच्या संख्येचा असामान्य उद्रेक झाला आहे. म्हणजेच त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. साताऱ्यातील कास पठारावर मी १७–२० पक्षी पाहिले, जे नेहमीच्या एका-दोनांच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. यावरुन स्पष्ट आहे की मध्य आशियातून आफ्रिकेकडे भारत मार्गे जाणाऱ्या त्यांच्या स्थलांतर मार्गात काहीतरी असामान्य घडले आहे. हे स्थानिक स्वरूपाचे आहे की हवामान बदलाचे व्यापक संकेत आहेत, हे निश्चित नाही. परंतु परिस्थिती बदलत आहे आणि यावर वैज्ञानिक अभ्यास आवश्यक आहे. – आदेश शिवकर, पक्षीतज्ज्ञ




संबंधित मजकूर