दि. डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँकेला सर्वोत्कृष्ट सर्वांगीण प्रगतीचा पुरस्कार

    13-Oct-2026


Deccan Merchants Co-op Bank Award

मुंबई, : (Deccan Merchants Co-op Bank Award) दि. मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने ₹२०१ ते ₹१,००० कोटी ठेवी असलेल्या सहकारी बँकांच्या गटामध्ये दि. डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँकेला सर्वोत्कृष्ट सर्वांगीण प्रगतीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी बंट्स संघ, कुर्ला येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
या पुरस्कार वितरण समारंभास दि. डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँकेचे माननीय अध्यक्ष श्री. मोरे साहेब, माननीय उपाध्यक्ष श्री. सावंत साहेब, माननीय संचालक श्री. भोळे साहेब, श्री. जारोळी साहेब, श्री. पोटफोडे साहेब, श्री. मिराणी साहेब तसेच स्थापत्य व परीक्षण विभागाचे विशेष कार्यपालन अधिकारी श्री. विचारे उपस्थित होते.(Deccan Merchants Co-op Bank Award)
 
बँकेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची आणि सर्वांगीण कार्यक्षमतेची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवाबद्दल बँकेचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, माननीय व्यवस्थापकीय संचालक, माननीय महाव्यवस्थापक तसेच बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!(Deccan Merchants Co-op Bank Award)
 




संबंधित मजकूर