हिंसाचाराचे खापर हिंदुत्ववादी संघटनांवर फोडण्याचे काँग्रेसी षड्यंत्र?

एनएसयूआयच्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपचा हल्लाबोल

    12-Oct-2026   


NSUI Viral Video

 
मुंबई (NSUI Viral Video) : निवडणूक प्रक्रियेतील फेरतपासणीदरम्यान अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये एनएसयूआयचे अधिकृत चिन्ह असलेले झेंडे आणि भगवे झेंडे हातात घेतलेले, तसेच भगव्या रंगाचे उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते दिसत आहेत.
 
समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडिओंमध्ये एनएसयूआयचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी आक्रमकपणे मोर्चा काढताना दिसत आहेत. त्यांच्याकडील झेंडे बदलतानाचे आणि पारंपरिक धार्मिक वेशभूषा धारण केल्याचेही दृश्य दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला असून, आंदोलनामागील नेमका हेतू काय, यावर चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनादरम्यान गोंधळ घालून हिंसाचाराचे खापर हिंदू संघटनांवर, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.(NSUI Viral Video)
 
भगवी वस्त्रे परिधान करणे हा अशांतता निर्माण करण्यासाठी आखलेल्या रणनीतीचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सहआंदोलक आणि पत्रकारांवर हल्ले करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करणे, हा या रणनीतीमागील उद्देश असल्याचा दावा केला जात आहे. भगवी उपरणी परिधान करून आणि धार्मिक प्रतीकांशी संबंधित झेंडे हातात घेऊन आक्रमक वर्तन करण्यामागे प्रत्यक्ष आंदोलनस्थळी हिंसाचार घडवून आणणे आणि त्यानंतर त्याचे खापर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर फोडणे, असा हेतू असल्याचा आरोप आहे.(NSUI Viral Video)
 
अशी माहिती आहे की, आंदोलनाच्या नियोजनाशी संबंधित गटांमधील अंतर्गत संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला. दि. १० ऑक्टोबर रोजी मिळालेल्या एका वृत्तानुसार, नियोजित आंदोलनापूर्वी काही सदस्यांना ‘फुल कसाब एनर्जी’ या शब्दांत वर्णन केलेल्या पद्धतीने वागण्याच्या सूचना दिल्याचा दावा करण्यात आला आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या स्क्रीनशॉटनुसार, काही सहभागी व्यक्तींना कपाळावर टिळा लावण्यास, हातात धार्मिक विधींमध्ये वापरला जाणारा कलावा अर्थात लाल पवित्र धागा बांधण्यास आणि भगव्या रंगाच्या शाली परिधान करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. पोलिसांशी सामना करताना ही प्रतीके वापरण्याच्या सूचना दिल्याचेही या संदेशांवरून सूचित होते. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्याशी संबंधित २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पद्धतीची नक्कल करून हिंसाचार घडवायचा आणि त्याचा दोष हिंदू संघटनांवर ढकलायचा, असा कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.(NSUI Viral Video)
 
या वादाच्या केंद्रस्थानी आंदोलनाच्या नियोजनाशी संबंधित गटांतील सदस्यांमध्ये झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट आहेत. नियोजित आंदोलनापूर्वी हिंदू धार्मिक प्रतीकांचा वापर करण्याबाबत या संभाषणात चर्चा झाल्याचे दिसते. एका संदेशात, 'आपण त्यांच्यासारखा पेहराव करावा का?' असा प्रश्न विचारण्यात आला असून, त्यावर 'होय!' असे उत्तर दिल्याचा दावा आहे. यानंतरच्या संदेशांमध्ये कपाळावर लाल टिळा लावणे आणि हिंदू धार्मिक विधींमध्ये वापरला जाणारा लाल पवित्र धागा अर्थात कलावा हातात बांधणे, अशा सूचना दिल्याचे सांगितले जाते. पारंपरिक धार्मिक साहित्य उपलब्ध नसल्यास लाल आणि भगव्या रंगाचा वापर करण्याबाबतही चर्चा झाल्याचा दावा आहे.
 
या घटनेवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी दि. ११ ऑक्टोबर रोजी आपल्या ‘एक्स’ व्यासपीठावर हा व्हिडिओ प्रसारित केला. काँग्रेसच्या हिंदूविरोधी भूमिकेवर टीका करत त्यांनी लिहिले, 'काँग्रेसचे मोठे षड्यंत्र! भगव्या रंगाची बदनामी करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते भगवे झेंडे हातात घेताना दिसले. कॅमेऱ्यात ते झेंडे बदलतानाही दिसत आहेत. कालच्या आंदोलनात हिंसाचार आणि जाळपोळ घडवून त्याचा दोष ‘हिंदुत्ववादी शक्तीं’वर ढकलण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने आपले कार्यकर्ते घुसवले होते. अराजकता आणि दंगली घडवण्याच्या कटाची अंमलबजावणी करतानाही काँग्रेसने आपली हिंदूविरोधी वृत्ती सोडली नाही!'(NSUI Viral Video)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर