
मुंबई - Madhu Kambikarज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने ७३व्या वर्षी निधन झालं. आपल्या दमदार अभिनयाने आणि बहारदार लावणीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मधु कांबीकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मधु कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना लोककलेची आवड होती. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. पुढे लावणी, वगनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.Madhu Kambikar
'गाढवाचं लग्न', 'विच्छा माझी पुरी करा' आणि 'भानगडीशिवाय पुढारी नाही' यांसारख्या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. रंगभूमीबरोबरच मधु कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही मोठं योगदान दिलं. 'शापित', 'एक होता विदूषक', 'झपाटलेला', 'बिनकामाचा नवरा', 'मुक्ता', ‘चल रे लक्ष्या मुंबईला’ आणि ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. विशेषतः लक्ष्याची चित्रपटातील आई म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.Madhu Kambikar
नोव्हेंबर २०१६ मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात लावणीचं सादरीकरण करताना त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हापासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. अखेर आज प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.Madhu Kambikar