३५० हून अधिक महिलांना अन्नप्रक्रिया उद्योगाची दिशा; सरकारी योजनांतून उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन

आमदार अॅड. माधवी नाईक यांच्याकडून नवउद्योजक आणि बचत गटांतील महिलांसाठी या शिबिराचे आयोजन

    11-Oct-2026

 

 
Madhavi Naik
 
ठाणे (Madhavi Naik): घरगुती खाद्यपदार्थांना व्यावसायिक स्वरूप देऊन स्वतःचा उद्योग उभारण्याची संधी आता महिलांसाठी उपलब्ध झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घेऊन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी ठाण्यात आयोजित शिबिराला ३५० हून अधिक महिलांनी प्रतिसाद दिला. भाजपच्या आमदार अॅड. माधवी नाईक यांनी नवउद्योजक आणि बचत गटांतील महिलांसाठी या शिबिराचे आयोजन केले होते. सरकारी योजनांच्या माध्यमातून अनुदान, कर्ज आणि उद्योग उभारणीसाठी मिळणाऱ्या मदतीची माहिती यावेळी देण्यात आली. (Madhavi Naik)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प सप्ताहा’अंतर्गत वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात हे शिबिर घेण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना (CMFPS) आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) यांची माहिती देण्यात आली. या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदानासह उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे महिलांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन करण्यात आले. (Madhavi Naik)
 
सध्याच्या काळात तयार खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. त्यामुळे महिलांना अन्नप्रक्रिया क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी चांगली संधी असून, सरकारी योजनांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि उत्पादनांच्या विपणनासाठीही मदत मिळू शकते. महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अॅड. माधवी नाईक यांनी केले. (Madhavi Naik)
 
देशात सध्या केवळ १० टक्के अन्नपदार्थांवर प्रक्रिया केली जात असल्याने या क्षेत्रात उद्योगवाढीला मोठा वाव असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक अभिषेक पवार यांनी पात्र महिलांना कर्जपुरवठा करण्याबाबत सहकार्याची ग्वाही दिली. (Madhavi Naik)
 
शिबिराला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक अभिषेक पवार, सहायक उद्योग अधिकारी मंजुषा देवरे, कृषी अधिकारी भगवान पठारे, तंत्र अधिकारी विशाल माने, एनयूएलएमचे अधिकारी मनीष वाघमारे, समीर शहा यांच्यासह सरकारी योजनांचा लाभ घेऊन उद्योग उभारलेले उद्योजक उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या ठाणे शहराध्यक्ष स्वप्नाली साळवी आणि सरचिटणीस रक्षा यादव यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. विद्या शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. (Madhavi Naik)
 




संबंधित मजकूर