सीजेपीच्या आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद; काय घडलं?

    10-Oct-2026

CJP protest in Maharashtra 
 
मुंबई (CJP protest in Maharashtra): नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे सध्या दिल्लीसह महाराष्ट्रातही वातावरण तापले आहे. (CJP protest in Maharashtra)
 
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटल्याचे दिसते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुषांर गांधी यांच्या हम भारत के लोग संघटनेचे लोक दुपारी ३.३० वाजता ॲागस्ट क्रांती मैदानात जमणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. (CJP protest in Maharashtra)
 
दरम्यान, सीजेपी नेत्यांच्या अटकेबाबत बोलताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, "दिल्लीच्या रस्त्यावर अराजकता निर्माण करायची, संविधानावर आणि संविधानाने निर्माण केलेल्या सरकारवर हल्ला करण्याचा आणि षडयंत्र रचण्याचा डाव काँग्रेस जिताओ पार्टी अर्थात सीजेपीच्या वतीने केला जात आहे. अभिजीत दीपके यांनी आंदोलनासाठी कुठलीही परवानगी घेतली नाही. कुठलीही परवानगी न घेतला दिल्लीच्या रस्त्यांवर धुडगूस घालून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल असे वर्तन केल्याने कदाचित पोलिसांनी त्यांच्यावर कारावई केली असेल." दुसरीकडे, उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री देशातील युवकांना घाबरलेत का? असा सवाल केला.  (CJP protest in Maharashtra)
 
हा काँग्रेसचा दुटप्पीपणा - केशव उपाध्ये
 
या आंदोलनावर भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये म्हणाले की, "काँग्रेसचे एसआयआरविरोधी आंदोलन म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे हा प्रकार आहे. कधी काळी १९५१ मध्ये ४५ टक्के असणारा काँग्रेसचा मतटक्का आता २१ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आणि त्यातून सुरू झाली काँग्रेसची एसआयरविरोधी आरडाओरड सुरु झाली आहे. एकीकडे इतिहास विसरायचा आणि दुसरीकडे जनतेची दिशाभूल करायची, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे.  (CJP protest in Maharashtra)





संबंधित मजकूर