परदेशातील हिंदुत्वविरोधी आंदोलनांमागे भारतातील डाव्या नॅरेटिव्हचा प्रभाव! -वी. भागैया जी यांचे प्रतिपादन

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पाञ्चजन्यच्या वतीने ‘सुशासन संवाद–मुंबई संकल्प’ या कार्यक्रमाचे आयोजन

    01-Oct-2026   
               
 
 V. Bhagaiah
 
मुंबई (V. Bhagaiah) : परदेशात संघ आणि हिंदुत्वाच्या नावाने होणाऱ्या विरोध प्रदर्शनांकडे पाहिले, तर त्याची मुळे भारतात असल्याचे दिसते. भारतातील काही लोक आपल्या राजकारणामुळे किंवा अन्य मुद्द्यांमुळे विदेशात जातात आणि ‘संघ भारतात अल्पसंख्याकांच्या विरोधात कार्य करतो,’ असा नॅरेटिव्ह मांडतात. मात्र, सत्य असे आहे की ज्या ठिकाणी हिंदू बहुसंख्य आहेत, तेथे अल्पसंख्याक सुरक्षित आहेत आणि ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक आहेत, तेथे हिंदू सुरक्षित नाहीत, असे चित्र आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य वी. भागैया जी यांनी केले. (V. Bhagaiah)
 
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पाञ्चजन्यच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी ‘सुशासन संवाद–मुंबई संकल्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाञ्चजन्यचे संपादक नितेश शंकर यांनी त्यांच्याशी विशेष संवाद साधला. (V. Bhagaiah)
 
भागैया जी म्हणाले, जगातील ज्या-ज्या देशांमध्ये हिंदू आहेत, तेथे हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी विविध संघटना स्थापन झाल्या आहेत. परदेशात गेल्यानंतर तेथील हिंदूंनी भाषा आणि राहणीमानानुसार वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या आहेत. याशिवाय, एखादी व्यक्ती दुसऱ्या देशात काम करत असेल, तर तो देश तिची कर्मभूमी आहे आणि त्या देशाप्रती समर्पित भावनेने तिने कार्य केले पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे. तेथील हिंदूंनी एकत्रितपणे राहावे, अशी अपेक्षा आहे. (V. Bhagaiah)
 
पुढे ते म्हणाले, भारताने विश्वगुरू होण्यापूर्वी विश्वबंधुत्व प्रस्थापित करणे आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनीही असेच केले होते. सर्व देशांशी मैत्री करायची आहे. या यात्रेचा लाभही आपल्याला मिळत आहे. आज जगाला हिंसेची नव्हे, तर प्रेमाची गरज आहे. जगाला परस्पर सहकार्य आणि परस्परपूरकतेची आवश्यकता आहे. (V. Bhagaiah)
 
हिंदुत्व म्हणजे काय हे मांडताना ते म्हणाले, हिंदुत्व सांगते की, कोणत्याही देवाची उपासना करा; मात्र सदाचाराशिवाय मोक्ष मिळणार नाही. त्यामुळे देवावर विश्वास नसलेली व्यक्तीही जर सदाचाराचे आचरण करत असेल, तर तिलाही मोक्ष प्राप्त होतो. हेच हिंदुत्व आहे. झोपलेल्या व्यक्तीला आणि जागृत व्यक्तीला उठवता येते. परंतु झोपेचे नाटक करणाऱ्या व्यक्तीला कधीही उठवता येत नाही. काही लोक स्वार्थामुळे किंवा विदेशातून प्रेरित होऊन अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करतात. संघर्षाशिवाय सर्वांना जोडणारी आणि संघर्षाशिवाय सर्वांचा सन्मान करणारी ही आपली पद्धती आहे. (V. Bhagaiah)
 
‘धर्मांतरण म्हणजे हिंसा... आम्ही ते सहन करणार नाही’
 
वी. भागैया यांनी म्हटले की, धर्मांतरण आम्ही सहन करणार नाही. धर्मांतरण म्हणजे हिंसा आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनीही असेच म्हटले आहे. ‘माझी उपासना पद्धतीच श्रेष्ठ आहे,’ असा अहंकार असणारेच धर्मांतरण करतात. हिंदुत्व सांगते की सत्य एक आहे आणि सत्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग अनेक आहेत. उपासना पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. केवळ माझ्याच उपासना पद्धतीद्वारे मोक्ष मिळतो, असे मानणे चुकीचे आहे. हे मानवतेच्या विरोधात आहे. (V. Bhagaiah)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर