जगाचे रक्षण करणारा भारतीय पायलट आणि जगाला संकटात टाकणारी दहशतवादी मानसिकता

    01-Oct-2026
 
 
Smit Machchhar
 
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संध्याकाळी flydubai चे FZ1073 विमान तेल अवीवकडे निघाले. विमानात १७४ प्रवासी होते. त्यात २७ लहान मुले, वृद्ध, कुटुंबे होती. जवळपास सर्वच प्रवासी इस्रायली होते. एक सामान्य उड्डाण म्हणून सुरू झालेला हा प्रवास काही तासात मृत्यूचा सापळा बनला. 
 
जॉर्डनच्या हवाई हद्दीत विमान ३३,००० फूट उंचीवर असताना अचानक कॉकपिटमध्ये हल्ला झाला. मीडिया रिपोर्टनुसार आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, को-पायलटने, जो ओमानचा नागरिक असल्याचे सांगितले जात आहे, कॅप्टनवर चाकूने हल्ला केला. 
 
तो हल्ला सामान्य भांडण नव्हता. तो विमान पाडण्याचा प्रयत्न होता. कॅप्टनला भोसकल्यानंतर त्या को-पायलटने विमानाचे कंट्रोल आपल्या हातात घेऊन विमानाला थेट खाली कोसळवण्यास सुरुवात केली. फ्लाइट रडारच्या डेटानुसार विमानाने अवघ्या ६० ते ९० सेकंदात जवळपास १४,००० ते १७,४०० फूट खाली झेप घेतली. विमानात ७७०० आणि नंतर ७५०० हा इमर्जन्सी आणि हायजॅकचा कोड वाजू लागला. इस्रायलने तात्काळ आपली लढाऊ विमाने हवेत पाठवली.
या क्षणी जर कॅप्टनने हार मानली असती तर आज आपण १७४ मृतदेहांची बातमी वाचत असतो. 
 
रक्षणकर्ता कोण? - भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छर
 
या मृत्यूच्या विमानात देवदूत बनून आले ते एक भारतीय. कॅप्टन स्मित मच्छर. वय ३९ वर्षे, मूळचे मुंबईचे, आधी स्पाइसजेटमध्ये काम केलेले आणि सध्या दुबईमध्ये स्थायिक असलेले दोन मुलांचे वडील. रक्ताने माखलेले असताना, पोटात आणि छातीत वार झालेले असताना, प्रचंड रक्तस्त्राव होत असताना स्मित मच्छर यांनी दोन गोष्टी केल्या ज्यामुळे सगळे वाचले. एक - त्यांनी त्या हल्लेखोराशी झटापट सुरूच ठेवली आणि विमानाचे कंट्रोल पूर्णपणे त्याच्या हातात जाऊ दिले नाही. दोन - त्यांनी कसेबसे रांगत जाऊन कॉकपिटचे दार आतून उघडले. 
 
दार उघडताच बाहेरचा आरडाओरडा कॉकपिटमध्ये आला. प्रवासी आणि क्रू मेंबर्सनी धाव घेऊन कॉकपिटमध्ये प्रवेश केला. त्यात यानिव हयून आणि असफ राजुआन या प्रवाशांनी आणि एका एअर होस्टेसने त्या हल्लेखोर को-पायलटला पकडून त्याला खाली पाडले. त्याच वेळी विमानातच प्रवासी म्हणून प्रवास करत असलेल्या flydubai च्या दुसऱ्या दोन पायलटनी कॉकपिटचा ताबा घेतला आणि विमानाला सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षित उतरवले. 
 
तबुकमध्ये उतरल्यावर समोरचे दृश्य भयानक होते. संपूर्ण कॉकपिट रक्ताने माखलेले होते. स्मित मच्छर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. तिथल्या प्रवाशांमधील एका डॉक्टरने, शोता मुसाएव यांनी सांगितले की, "जर आणखी काही मिनिटे उशीर झाला असता तर आम्ही त्यांना गमावले असते. त्यांचा रक्तदाब पूर्णपणे खाली गेला होता." 
 
नंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या शौर्याबद्दल इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्वतः त्यांचे नाव घेऊन अभिनंदन केले. भारतीय दूतावासानेही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
 
हा आहे भारतीय संस्कार. हा आहे हिंदू संस्कृतीतला "स्वतःचा प्राण धोक्यात घालून दुसऱ्याला वाचवणे" हा विचार.
 
मग दुसऱ्या पायलटचे नाव का लपवले जात आहे?
 
हा लेख लिहिण्याचे खरे कारण इथून सुरू होते.
कॅप्टन स्मित मच्छर यांचे नाव, फोटो, गाव, त्यांचे कुटुंब - सगळे जगासमोर आले. पण ज्या को-पायलटने १७४ लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याचे नाव का लपवले जात आहे? आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये फक्त "ओमानी नागरिक" इतकेच का सांगितले जात आहे? त्याचा स्पष्ट फोटो का नाही? त्याची पार्श्वभूमी, त्याचे शिक्षण, तो कोणत्या विचारसरणीने प्रेरित झाला होता, याची माहिती का दिली जात नाही?
 
इथेच मीडिया आणि काही राजकीय यंत्रणांची पद्धतशीर भूमिका दिसते. जेव्हा हल्ला करणारा एका विशिष्ट विचारसरणीतून येतो, तेव्हा त्याला लगेच "मानसिक रुग्ण" किंवा "अज्ञात कारण" असे सांगून विषय संपवला जातो. त्याचा धर्म, त्याची प्रेरणा यावर चर्चा करणे टाळले जाते. आणि हाच आमचा प्रश्न आहे. आम्हाला नेहमी सांगितले जाते की आतंकवादाला धर्म नसतो. जर धर्मच नसेल तर मग नाव लपवण्याची काय गरज आहे? जर धर्मच नसेल तर मग तो ओमानी आहे की आणखी कोणी, हे सांगायला काय हरकत आहे? जसे वाचवणाऱ्याचा धर्म, देश अभिमानाने सांगता, तसाच मारणाऱ्याची ओळखही तितक्याच स्पष्टपणे सांगा.
हीच ती पोपटपंची आहे जी लोकांना आता समजली आहे. सत्य लपवून तुम्ही दहशतवाद संपवू शकत नाही.  (Smit Machchhar)
आतंकवादाला धर्म नसतो का? - या घटनेतून काय शिकायचे
 
या घटनेला इस्रायली अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे "संभाव्य दहशतवादी हल्ला" म्हटले आहे. का? कारण हा रागातून झालेला हल्ला नव्हता. हा पूर्वनियोजित विचार होता - विमानातले सगळे इस्रायली प्रवासी आणि ते विमान इस्रायलमध्ये जाऊन कोसळावे, जेणेकरून जास्तीत जास्त नुकसान व्हावे. हा विचार कुठून येतो? हा द्वेष कुठून येतो?
जगाच्या इतिहासात जर आपण पाहिले तर विमान हायजॅक करून, निरपराध लोकांना मारून आपला धर्म किंवा विचारसरणी मोठी करण्याची पद्धत एकाच विशिष्ट अतिरेकी विचारधारेतून आली आहे. ९/११ असो, किंवा इतर अनेक विमान अपहरणे असोत.
 
याउलट, भारतीय आणि हिंदू विचारधारा काय शिकवते? स्मित मच्छर यांनी काय केले? त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्या धर्माच्या, दुसऱ्या देशाच्या लोकांना वाचवले. त्यांनी विचारले नाही की विमानात कोणत्या धर्माचे लोक आहेत. त्यांच्यासाठी ते १७४ माणसे होती. हाच फरक आहे. म्हणून आम्ही म्हणतो, रक्षण करणारी संस्कृती आणि नाश करणारी मानसिकता यातला फरक ओळखायला शिका. सगळे मुस्लिम दहशतवादी नसतात, हे खरे आहे आणि ते आम्ही मानतो. पण आज जगात होणारे ९०% आत्मघातकी हल्ले आणि विमान हायजॅकचे प्रयत्न कोणत्या विचारातून येतात, हे लपवून कसे चालेल?
 
या सगळ्यात एक गोष्ट आपल्या देशासाठी पण शिकण्यासारखी आहे.
आपल्या देशात अशी एक डावी जमात आहे जी प्रत्येक वेळी जिहादी विचाराचे समर्थन करण्यासाठी पुढे येते. जेव्हा जेव्हा असा हल्ला होतो, तेव्हा हे लोक लगेच त्या दहशतवाद्याला वाचवण्यासाठी "धर्माला धर्माशी जोडू नका", "हा तर गरीब होता", "याला तर भेदभावामुळे असे करावे लागले" अशा थिअरी द्यायला सुरुवात करतात.
 
दुबई-इस्रायल विमानाच्या घटनेवरही हेच होणार. हे डावे विचारवंत स्मित मच्छर यांच्या शौर्याबद्दल एक शब्दही बोलणार नाहीत, पण त्या हल्लेखोर को-पायलटच्या मानवाधिकारावर मात्र मोठे लेख लिहितील.
त्यांनी पण विचार करावा. तुम्ही ज्या विचाराचे समर्थन करता, त्या विचाराने भरलेल्या विमानात जर तुमचे स्वतःचे कुटुंब असते तर? आज विमानात २७ लहान मुले होती. त्या मुलांचा काय दोष होता?
 
कॅप्टन स्मित मच्छर यांनी धर्म न पाहता माणसे वाचवली. पण मारणाऱ्याने धर्म पाहूनच मारण्याचा प्रयत्न केला, हे वास्तव आहे. त्यामुळे उगाच सेक्युलरिझमच्या नावाखाली दहशतवाद्यांना पाठीशी घालणे बंद करा. देशाचे रक्षण करणाऱ्या हातांना बळ द्या, देशाचे नुकसान करणाऱ्या विचाराला नाही. 
 
शेवटचा मुद्दा
 
FZ1073 ची घटना ही फक्त एका विमानाची घटना नाही. ती दोन विचारधारांची टक्कर आहे. एक विचारधारा जी म्हणते - माझा धर्म मोठा करण्यासाठी मी १७४ लोकांना मारेन. आणि दुसरी विचारधारा - माझा धर्म मला शिकवतो की १७४ अनोळखी लोकांसाठी मी माझा जीव देईन.
 
पहिल्या विचाराचा प्रतिनिधी आज सौदी अरेबियाच्या तुरुंगात आहे, त्याचे नाव लपवले जात आहे. दुसऱ्या विचाराचा प्रतिनिधी आज हॉस्पिटलमध्ये आहे, रक्ताने माखलेला आहे, पण तो हिरो म्हणून जगासमोर आहे.
जगाने ठरवायचे आहे की त्याला कोणत्या विचारासोबत जायचे आहे. सत्य लपवून ठेवल्याने सत्य बदलत नाही. कॅप्टन स्मित मच्छर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे की खरा हिंदू, खरा भारतीय कसा असतो - जो जगाचे रक्षण करतो.
आम्ही त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. 
 
-ज्ञानेश्वर राक्षे
आटपाडी
 




संबंधित मजकूर