मुंबई (India vs Sri Lanka Asian Games 2026): भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव करत एशियन्स गेम्स फायनलमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. आता शनिवारी सुवर्णपदकासाठी टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. आशियाई खेळांमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट संघ आमने सामने येणार आहेत. (India vs Sri Lanka Asian Games 2026)
भारताने जपानच्या निशिन येथे खेळवल्या जाणाऱ्या सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा बॅटींग करत २० ओव्हरमध्ये सात गडी बाद १६९ धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेचा संघ ९.५ ओव्हरमध्ये केवळ ४५ धावांवर गारद झाला. श्रीलंकेचे एकूण सहा फलंदाज खाते न उघडताच परतले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येक दोन-दोन गडी बाद केले. तीन फलंदाज रनआऊट झाले. ईशान किशनने केलेली ८० धावांची पारी विजयासाठी भरीव योगदान ठरली. वैभव सुर्यवंशीन २१ चेंडूत ३८ धावा घेतल्या. (India vs Sri Lanka Asian Games 2026)
पाकिस्तानचा बांगलादेशवर विजय
पाकिस्तानी क्रिकेट संघाने सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा सहा विकेटने पराभव केला. पावसामुळे हा सामना १३-१३ षटकांचा करण्यात आला होता. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी गरत सात विकेट गमावत १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने ११.३ षटकांत सहा गडी राखून विजय मिळवला.. (India vs Sri Lanka Asian Games 2026)
२०२३मध्ये पटकावले होते सुवर्णपदक
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात निघालेल्या टीम इंडियाने जपानमध्ये २०२३ साली सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी टीम इंडिया केवळ १० षटकांचा सामनाच खेळू शकली होती. भारताने यजमान संघ जपानवर दोन धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही देशांचे राजनैतिक संबंधांसाठी ऐतिहासिक क्षण म्हणून हा सामना खेळवण्यात आला होता. तुफान पावसामुळे हा सामना केवळ पाच-पाच षटकांचाच खेळवण्यात आला. दरम्यान हा सामना आशियायी खेळांचा भाग नव्हता. (India vs Sri Lanka Asian Games 2026)
भारताचा संघ टी-२० सामन्यांत चमक दाखवण्यात यशस्वी झाला आहे. पाचही सामने विजयी होत आता अंतिम फेरीत दाखल झाला आहे. तर श्रीलंकेला पाच पैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर एका सामन्यात विजय मिळाला होता. भारताविरुद्ध श्रीलंकेला पाचही सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. भारताविरोधात शेवटचा विजय २०२३ साली मिळाला होता. (India vs Sri Lanka Asian Games 2026)