मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्री सहायता निधीत १० लाख रुपये जमा

    23-Jul-2025   

मुंबई : 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सुपूर्द केला. फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ, बॅनर किंवा होर्डिंग लावण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री नितेश राणे यांनी ही मदत कक्षाकडे जमा केली.




सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
संबंधित मजकूर