महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे ‘मातृभाषेतून शिक्षण’ हा मूलभूत विचार अधोरेखित करण्याबरोबरच, संघ हिंदी भाषा अन्य भाषकांवर लादू इच्छितो, या अपप्रचारही आता धुळीस मिळाला आहे. मातृभाषा
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) शताब्दी वर्षानिमित्ताने देशभरात हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे, असे संघाचे मत असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत केले.
देशाला राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय गीताप्रमाणेच एक ‘राष्ट्रीय भाषा’ ही असलीच पाहिजे, असा आग्रह भारतासह जगभरातील अनेक देशांचा अजिबात नाही. पण, एक देश म्हणून व्यवहाराच्या भाषेचा प्रश्न येतो तेव्हा भारताची राज्यघटना, ती घटना तयार करणारी संविधान सभा आणि त्यांच्या उद्दिष्टांचा कालसुसंगत अन्वयार्थ लावायला हवा.
हिंदी ही राष्ट्रभाषा असायला हरकत नाही, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. तसे झाल्यास आपल्या भाषिक वेगळेपणाबाबत जास्तच संवेदनशील असलेल्या दक्षिणेतून विरोधी आवाज उठवला जातो. हे स्वातंत्र्यपूर्व काळातही झालेच होते, स्वातंत्र्यानंतरही आणि आताही होताना दिसते. म्हणूनच हिंदी भाषेचा शैक्षणिक धोरणात समावेश करायचाच असेल तर तो तारतम्याने, चर्चेने आणि सर्वांना विश्वासात घेऊनच करायला हवा.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुधारीत मसुदा मानव संसाधन विकास मंत्रालयाने जारी केला