भारतासाठी हा चक्रीवादळांचा हंगाम आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळ बुलबुलमुळे विध्वंसानंतर, त्यानंतर वादळ नाक्रीमुळे उद्भवलेल्या शक्यतांना भारताने यशस्वीरित्या बाजूला सारले. तथापि, धोका अजून संपलेला नाही
Read More
अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन ६ नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत.
पूर्व मध्य अरबी समुद्रातल्या ‘महा’ चक्रीवादळाचे रुपांतर अति विनाशकारी चक्रीवादळात झाले असून, या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहे.
गुजरात, महाराष्ट्र तसेच दमण आणि दीव इथल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या तयारीचा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजेश गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
पुण्याच्या काही भागात २६ ऑक्टोबरपर्यंत एक किंवा दोन तीव्र सरींची शक्यता आहे. गेल्या २४ तासात पुण्यात ३.८ मिमी पावसाची नोंद झाली.