यूसीसी सनातनींसह मुस्लिमांनाही समान स्वातंत्र्य देणारी व्यवस्था : इंद्रेश कुमार

    30-Jun-2026   
Uniform Civil Code UCC Indresh Kumar
 
मुंबई : (Uniform Civil Code UCC Indresh Kumar) समान नागरी कायदा (यूसीसी) सनातनींसह मुस्लिम, शीख आणि सर्व धर्मीयांना समान स्वातंत्र्य देणारी व्यवस्था आहे. असे प्रतिपादन मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी केले. रायपूर येथे समान नागरी संहितेवरील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
ते म्हणाले, "यूसीसी कोणत्याही जात, पंथ किंवा भाषेच्या विकासात अडथळा ठरणार नाही. सर्वांचा समान विकास व्हावा, हीच त्यामागची भावना आहे. यूसीसीमुळे मुस्लिम समाजाला धोका आहे, असे सांगितले जात असेल तर ते पूर्णपणे खोटे आहे. लोकांना दिशाभूल करणारे हे मुस्लिम समाजाचे आणि देशाचेही विरोधक आहेत. (Uniform Civil Code UCC Indresh Kumar)
 
धर्मांतरणाच्या मुद्द्यावर बोलताना इंद्रेश कुमार यांनी अत्यंत ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, ज्यांना धर्मांतरण हवे आहे, त्यांच्यासाठी भारतात स्थान नाही. भारत हा सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश आहे. येथे धर्मद्वेषाला नव्हे, तर परस्पर आदराच्या संस्कृतीला स्थान आहे. धर्मांतरणाची मानसिकता भारतीय संस्कृतीला मान्य नाही. भारताची ओळख धर्मांतरणात नसून सर्व धर्मांचा सन्मान आणि आपल्या सांस्कृतिक मुळांशी असलेल्या नात्यात आहे. (Uniform Civil Code UCC Indresh Kumar)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर