मुंबई : (Supreme Court Ayodhya Ram Temple Petition) अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातील चढाव्याच्या कथित चोरीप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणात इतकी घाई कशाची? असा प्रश्न न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला. न्यायालयाच्या सुट्ट्या संपल्यानंतरच या याचिकेवर सुनावणी होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर निधीचा कथित गैरवापर झाल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ट्रस्टच्या निधीमध्ये कथित अनियमितता झाल्याचा दावा करत त्याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे. याचिकेत केवळ एफआयआर दाखल करण्याची मागणीच करण्यात आलेली नाही, तर या प्रकरणाचा तपास सीबीआय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येणाऱ्या एसआयटी कडून करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.(Supreme Court Ayodhya Ram Temple Petition)
तसेच हा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि तपासासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, जेणेकरून प्रकरणाचा निकाल विनाकारण लांबणार नाही, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आल्यानंतर याचिकाकर्त्याने तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने त्यास नकार देत, या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याइतपत कोणतेही विशेष कारण दिसत नसल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाच्या सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येईल, असे निर्देश दिले.(Supreme Court Ayodhya Ram Temple Petition)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक