सिंधुदुर्गातील 'शक्तिपीठ' व्याघ्र प्रजनन क्षेत्रात; प्रस्तावित मार्गावर पिल्लांसह दोन वाघिणी

    30-Jun-2026
sahyadri tiger


मुंबई (अक्षय मांडवकर) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्ग क्षेत्रात सात ते आठ वाघांचा वावर आढळून आला आहे (sahyadri tiger). महत्त्वाचे म्हणजे या प्रस्तावित मार्ग क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षांपासून दोन वाघिणी पिल्लांना जन्म देत आहेत (sahyadri tiger). शिवाय सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील सहा आणि दोडामार्ग-आंबोली संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रामधून या महामार्गाचे मार्ग क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे (sahyadri tiger). त्यामुळे या याठिकाणी पर्यायी मार्ग किंवा वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे पुरेशा संख्येने आणि योग्य आकाराचे वन्यजीव अंडरपास/ओव्हरपास बांधणे गरजेचे आहे. (sahyadri tiger)
 
 
पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी या प्रस्तावित शक्तिपीठ द्रुतगती महामार्गातील शेवटचा टप्पा आहे. या महामार्गाच्या सुधारित आराखड्यातील प्रस्तावित मार्ग क्षेत्र ज्याठिकाणी सिंधुदुर्गात पोहोचते तो संपूर्ण भूभाग सह्याद्री–राधानगरी–गोवा व्याघ्र भ्रमणमार्गातील महत्त्वाचा भाग आहे. 'महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळा'ने अलीकडील बैठकीत 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'ने (एनटीसीए) २०२४-१५ मध्ये प्रकाशित केलेल्या 'टायगर काॅरिडोर अॅटलास'मधील अधिकृत व्याघ्र भ्रमणमार्गांनाच मान्यता देण्याचे ठरवले आहे. या अॅटलासमध्ये पश्चिम घाटातील वाघांच्या संचारासाठी सह्याद्री–राधानगरी–गोवा हा भ्रमणमार्ग महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. आता याच भ्रमणमार्गाला छेदून शक्तीपीठच्या सुधारित आराखड्यातील प्रस्तावित मार्ग जात आहे.
 
 
या महामार्गाच्या प्रारंभीच्या आराखड्याला सिंधुदुर्गातून मोठा विरोध झाल्याने या मार्गात बदल करण्यात आले. त्यानुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गेळे, आंबोली, वेर्ले, तळकट आणि कोलझर या गावांना वगळण्यात आले. मात्र, सुधारित आरखड्यामध्ये सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील कुंभवडे, फुकेरी, झोळंबे, पडवे-माजगाव, उडेली, फणसवडे या गावांमधून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या संपूर्ण क्षेत्रामध्ये सात ते आठ वाघांचा अधिवास आहे. 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी केलेल्या अभ्यासात या परिसरात दोन वाघ आढळून आले आहेत. याखेरीच 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'ने (डब्लूसीटी) वन विभागाच्या मदतीने केलेल्या अभ्यासात या क्षेत्रात वाघांचा अधिवास आढळून आला आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग निवडणे किंवा नागपूर–जबलपूर NH-44 या रस्तावर पेंच व्याघ्र प्रकल्पानजीक बांधण्यात आलेल्या अंडरपाससारखेच बांधकाम सिंधुदुर्गातील व्याघ्र अधिवासाच्या पट्ट्यात उभारणे आवश्यक आहे.
 
 
मार्गावर वाघिणींची पिल्ले
शक्तीपीठच्या सुधारित आरखाड्यातील सिंधुदुर्गातील प्रस्तावित मार्ग क्षेत्रामध्ये दोन वाघिणी आपल्या पिल्लांसोबत नांदत आहेत. 'डब्लूआयआय'च्या अहवालात नमूद करण्यात 'एल-टू' नावाच्या वाघिणीने २०२२ मध्ये या भागात दोन पिल्लांना जन्म दिला होता. याखेरीज २०२४ पासून अजून एक वाघिणी प्रस्तावित मार्ग क्षेत्रामध्ये पिल्लांना जन्म देत आहे. २०२६ मध्ये देखील तिच्यासोबत पिल्लं आढळली असून आजवर तिने सहा पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे महामार्गासाठी पर्यायी मार्ग निवडणे किंवा वन्यजीव पूरक उपाययोजात्मक बांधकाम करणे गरजेचे आहे.




संबंधित मजकूर