भूवनेश्वर : (Jagannath Rath Yatra 2026) पवित्र देवस्नान पौर्णिमेनिमित्त पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या रथयात्रा महोत्सवाची औपचारिक सुरुवात होते. हा दिवस भगवान जगन्नाथांचा जन्मोत्सव म्हणूनही मानला जातो.
रथयात्रेव्यतिरिक्त वर्षभरात केवळ याच दिवशी भक्तांना भगवान जगन्नाथांचे मुक्त दर्शन घेण्याची संधी मिळते. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान जगन्नाथ रत्नसिंहासनावरून मंदिर परिसरातील खुल्या स्नानवेदीवर विराजमान होतात. तेथे त्यांना १०८ कलशांतील पवित्र जलाने अभिषेक करण्यात येतो.(Jagannath Rath Yatra 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक