Home

Organ Donation Mumbai : एकाच दिवसात ६ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी! रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलची वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी

(Organ Donation Mumbai) रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने आपल्या अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमात आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एका दिवसात दोन मरणोत्तर अवयवदानाची यशस्वी अंमलबजावणी करत रुग्णालयात सहा जीव वाचवणाऱ्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. यासोबतच भारतातील आघाडीच्या अवयव प्रत्यारोपण केंद्रांसोबत अवयव आणि ऊतींची (टिश्यू) देवाणघेवाणही करण्यात आली...

पनवेल-सीएसएमटी एसी लोकलमध्ये धर्मांतरणाचा प्रयत्न! रेल्वेतही ख्रिश्चन मिशनऱ्यांचा सुळसुळाट

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या आता ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या छुप्या धर्मांतर मोहिमेचे केंद्र बनू लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हार्बर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) एसी लोकलमध्ये थेट ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारी आणि प्रवाशांना आकर्षित करणारी पत्रके चिकटवण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर अशा प्रकारे धार्मिक प्रचारासाठी आणि धर्मांतराला प्रवृत्त करण्यासाठी केला जात असल्याने रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त ..

'जेन झी' तरुणांवर संघाचा पूर्ण विश्वास! : सुनील आंबेकर

"देशाच्या नव्या म्हणजेच 'जेन झी' पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी आहे. आजचे तरुण आपल्या परंपरा आणि भारताच्या गौरवाशी मनापासून जोडले गेले असून समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. पुण्याच्या नवी पेठेतील 'पुणे श्रमिक पत्रकार संघा'च्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते...

हल्दीघाटीच्या युद्धासंदर्भातही तथ्यांचे पुनर्मूल्यांकन आवश्यक! : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

"इतिहास अनेकदा सत्तेच्या जवळ राहणाऱ्यांनी आपल्या दृष्टिकोनातून मांडला, त्यामुळे अनेक राष्ट्रीय नायकांच्या योगदानाला अपेक्षित स्थान मिळाले नाही. हल्दीघाटीच्या युद्धासंदर्भातही तथ्यांचे पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे. आज देशभर महाराणा प्रताप यांची जयंती श्रद्धा आणि सन्मानाने साजरी केली जाते, हेच राष्ट्र आपल्या खऱ्या नायकांना कधीच विसरत नाही याचे मोठे प्रमाण आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले...

तृणमूलचा ऱ्हास, भाजपचा विकास! पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना ऐतिहासिक धक्का; तृणमूलमध्ये उभी फूट, खासदार आणि आमदारांचे राजीनामा सत्र

मुंबई : (Trinamool Congress) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ मधील तृणमूल काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाली. ममता बॅनर्जींचे सरकार जाऊन शुभेंदू अधिकारींचे सरकार आल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी उभी फूट पडल्याचे दिसले. 'मा-माटी-मानुष'चा नारा देणाऱ्या तृणमूलचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होताना दिसत आहेत...

१,५०० पानांच्या आरोपपत्रात इम्तियाज जलील यांचे नाव; नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हिंदू कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण, फसवणूक, तसेच धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने नाशिक न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १,५०० पानांच्या या आरोपपत्रात साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि तपासातील निष्कर्षांचा समावेश असून अनेक नव्या नावांचा आणि आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचाही उल्लेख यात असल्याचे दिसते आहे...

कॉर्पोरेट जिहाद! धर्मांतरास नकार दिल्याने महिलेचा घेतला राजीनामा; नेमकी भानगड काय?

नाशिकच्या टीसीएस कंपनीत घडलेल्या कॉर्पोरेट जिहादच्या प्रकरणानंतर आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विप्रो टेक्नॉलॉजीजच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, तिला सतत धार्मिक छळ, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव, कार्यस्थळी भेदभाव आणि अखेरीस नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. हे सर्व तिने एका सहकाऱ्याच्या कथित वर्तनामुळे घडल्याचा आरोप केला आहे. सदर प्रकरणी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच कंपनीला कायदेशीर नोटीस बजावून नोकरीत पुनर्नियुक्..

गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा! सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल इथला गोपाळगड किल्ला मालकी हक्काच्या मुद्द्यावरून वादाचा भोवऱ्यात सापडला होता. मात्र आता स्वतः राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले...

बंदी असूनही रस्त्यावर नमाज; यूपीत ४० जणांविरोधात गुन्हा दाखल!

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात बकरी ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज अदा केल्याच्या प्रकरणी यूपी पोलिसांनी १५ नामनिर्दिष्ट व्यक्तींसह एकूण ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू करून संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला...

रस्त्यावरील नमाज पठण तातडीने बंद करा! : किरीट सोमय्या

मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या नमाज पठणामुळे वाहतूक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून रस्त्यावरील नमाज पठण तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे...

"बकरा हलाल होताना पाहिलंय?"; गाझियाबादेत ईदला धर्मांधतेचा अतिरेक! १७ वर्षीय हिंदू युवकाची हत्या

गाझियाबादच्या खोडा येथे हिंदू युवक सूर्या चौहान याची पोटात सुरा खुपसून हत्या करणात आली. या प्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला असून त्यांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आणखी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य आरोपी असद आणि त्याचे कुटुंबीय फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके विविध ठिकाणी छापे टाकत आहेत...

बकरीदला तेलंगणातल्या रस्त्यांवर रक्ताचे पाट; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

तेलंगणातील हैदराबादमधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मुशीराबाद परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते आहे. या व्हिडीओमध्ये बकरीदच्या निमित्ताने जनावरांची कुर्बानी दिल्यानंतर परिसरातील रस्ते रक्तरंजीत झाल्याचे दिसते आहे. हे भयावह आणि अस्वच्छ दृश्य बांगलादेश मार्केटपासून आसपासच्या हिंदू वसाहतींच्या रस्त्यांपर्यंत पसरल्याचे व्हिडिओतून कळते आहे. हा प्रकार पाहून स्थानिक हिंदू समाजात, विशेषतः महिलांमध्ये, प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे...

काँग्रेस सरकारच्या काळात छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याचा लिलाव?

गुहागरच्या अंजनवेल तालुक्यातील ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला 'गोपाळगड किल्ला' सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा किल्ला १९६० मधील तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांनी मणियार कुटुंबीयांना लिलावात विकल्याचा दावा अय्याज मणियार यांनी केला आहे. सदर प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने ही गोष्ट उघडकीस आली. काही दुर्गप्रेमी आणि पुरातत्व विभागाने केलेल्या कायदेशीर लढ्यानंतर हा किल्ला यापूर्वीच सरकारच्या ताब्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे...

कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळताच लवांडेना पुण्यातून अटक! कीर्तनकारांना घुसखोर म्हणणे चांगलेच भोवले

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर वाघोली पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यालाच दुजोरा देत विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर म्हणून २० जणांची नावे जाहीर केली होती...

संयुक्त राष्ट्रसंघात भारताकडून पाकिस्तानची बोलती बंद! दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार फटकारले

भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानची बोलतीच बंद केली. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. पाकिस्तानवर प्रहार करताना त्यांनी म्हटले की, ज्या देशाचा इतिहास नरसंहार आणि हिंसाचाराने भरलेला आहे, त्या देशाला भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. इतकेच नव्हे, तर सीमापार दहशतवादाबाबत भारताने संयुक्त राष्ट्रांत कठोर संदेश देत दहशतवादाला पाठिंबा ..

मदरशांतही दुमदुमणार ‘वंदे मातरम्’; बंगाल सरकारचा मोठा निर्णय!

पश्चिम बंगाल सरकारने सरकारी शाळांनंतर आता सरकार मान्यता प्राप्त मदरशांमध्येही ‘वंदे मातरम्’ गायन अनिवार्य केले आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने राज्याच्या शिक्षण आणि सामाजिक संरचनेत एक अभूतपूर्व बदल करत अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मदरशांमध्ये तत्काळ प्रभावाने ‘वंदे मातरम्’ गाणे सक्तीचे केले आहे...

मालवणीत बेकायदा पाणपोई उभारणाऱ्या जिहाद्यांविरोधात एफआयआर दाखल!

मालवणी परिसरातील अब्बासिया कंपाऊंड येथे एका हिंदू महिलेच्या घरासमोर अनधिकृतरित्या छबील (पाणपोई) उभारण्याचे काम सुरु होते. या बांधकामामुळे घराचे दार बंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता. सदर बांधकामाविरोधात पीडित महिलेच्या पतीने आवाज उठवला असता शौकत हूसेन आबीद हूसेन सय्यद (बांधकाम धारक) आणि दिलशाद खान (ठेकेदार) या जिहाद्यांनी तिला धमकावले आणि शिवीगाळ केली. मंत्री मंगलप्रभात लोढा, विश्व हिंदू परिषद आणि दै. मुंबई तरुण भारत यांनी मिळून या विषयात लक्ष घातल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृतरित्या ..

ममता सरकारचा ओबीसी फॉर्म्युला रद्द; बंगालमध्ये आता फक्त ७% आरक्षण!

पश्चिम बंगालमधील शुभेंदू अधिकारी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या यादीत आणि नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या निर्णयानुसार राज्यातील ओबीसी आरक्षण १७ टक्क्यांवरून कमी करून ७ टक्के करण्यात आले आहे. हा निर्णय २०२४ मध्ये आलेल्या कलकत्ता उच्च न्यायालय च्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले होते की, राज्यात केवळ ७ टक्के ओबीसी आरक्षण वैध राहील आणि त्याअंतर्गत फक्त ६६ प्रवर्गांनाच आरक्षणाचा लाभ मिळू शकेल...

अभिषेक बॅनर्जी कुटुंबाच्या ४३ मालमत्तांवरून बंगालमध्ये खळबळ! भाजपचा तपशीलवार हल्लाबोल

कोलकाता महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या कुटुंबाशी संबंधित मालमत्तांबाबत त्यांची आई लता बॅनर्जी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सुरुवातीला ही बातमी फक्त अवैध बांधकाम आणि बिल्डिंग प्लॅनच्या तपासणीसाठी नोटीस जारी झाल्यापुरतीच मर्यादित होती. परंतु, आता या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न त्या मालमत्तांवरून उपस्थित होत आहे, ज्यांचा तपशील भाजपने जाहीर केला आहे...

हिंदू समुदायावर अन्याय करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल! : मंत्री मंगलप्रभात लोढा

मालवणी येथील स्थानिक नगरसेवक आणि आमदाराच्या आशीर्वादानेच अनधिकृत बांधकामाला खतपाणी मिळत असून स्थनिकांवर दबावतंत्राचा वापर करून बांगलादेशींना आश्रय दिला जात असल्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले. भू-माफियांचा आणि अनधिकृत बांधकाम करणारे हिंदू समुदायावर अन्याय करत असून आता हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, तर त्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले...

वांद्रेतील ‘गरीब नगर’ वस्तीतील अवैध बांग्लादेशी अतिक्रमण हटवण्यास सुरुवात!

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ‘गरीब नगर’ परिसरात असलेले बांग्लादेशी अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेस मंगळवारी सुरुवात झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात केली. ही कारवाई पुढील चार दिवस सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे उपनगरीय रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत ७०० झोपड्या व बांधकामे उभी राहिली होती. रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने हा ..

भारताच्या ‘लाईफलाईन’ला बळकटी; ‘सिलीगुजी कॉरिडॉर’मध्ये केंद्र सरकारचा मेगा प्लॅन सुरू!

पश्चिम बंगालमधील सर्वात संवेदनशील मानला जाणारा सिलीगुडी कॉरिडॉर संदर्भात मोठा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घकाळ रखडलेल्या महामार्ग प्रकल्पांना अखेर मंजुरी मिळाली असून, याचे श्रेय राज्यातील नव्या शुभेंदू सरकारला दिले जात आहे. शुभेंदू सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक दिवस प्रलंबित असलेल्या फाइल्सना गती मिळाली आणि त्यामुळे केंद्र सरकारला या महत्त्वाच्या भागात रस्ते व पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे...

मिरा रोडमध्ये तरुण-तरुणीला धर्मांध मुस्लिमांकडून मारहाण! पाच जणांविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरु

मिरा रोड परिसरातून हिंदू तरुण-तरुणीला धर्मांध मुस्लिमांकडून गंभीर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ओला-उबर चालक अजय चौधरी आणि त्याच्या मैत्रिणीने मिरा रोड पोसील ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. १८ मे रोजी मीरा-भाईंदर रोडवरील शिवर गार्डनजवळील महानगर गॅस पंप येथे घडली...

मालवणीत हिंदू कुटुंबावर दबावतंत्र; अनधिकृत बांधकामाचे पितळ उघडे!

मालवणी परिसरातील अब्बासिया कंपाऊंड येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामामुळे स्थानिक हिंदू कुटुंब प्रचंड दबावाखाली आलेय. काँग्रेस नगरसेवक हैदर अस्लम शेख यांच्या वरदहस्ताने आणि दबावतंत्रामुळे हे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात या संपूर्ण काळ्या कारभाराचे पितळ उघडे पडले...

फरक्कावर बांग्लादेशकडून कुरघोडीचा प्रयत्न! पद्मा बॅरेजवरून तारिक रहमानचे भारतविरोधी दबावतंत्र

बांग्लादेश आणि भारत यांच्यातील नदीच्या पाण्याच्या वाटपाचा मुद्दा आता नव्या वळणावर जाताना दिसतोय. बांग्लादेशमधील तारिक रहमान सरकारने पद्मा नदीवर विशाल बॅरेज उभारण्यासाठी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. भारतातील फरक्का बॅरेजमुळे निर्माण झालेल्या परिणामांना तोंड देण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचा दावा ढाकाने केलाय. पद्मा नदीलाच भारतात गंगा नदी म्हणून ओळखले जाते...

ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. काही महिन्यापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मानसिक आजार आणि मानसोपचारावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. एकूण मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते...

पश्चिम बंगालमध्ये शालेय प्रार्थनेत ‘वंदे मातरम्’चा समावेश अनिवार्य

पश्चिम बंगालमधील शुभेंदू अधिकारी सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य केले आहे. शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ गायचे असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याची माहिती आहे...

बंगालमध्ये पशुवधावर कठोर निर्बंध; शुभेंदू सरकार अॅक्शन मोडवर!

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच शुभेंदू अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आलेत. त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमध्ये सर्वप्रथम धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे आणि रस्त्यांवरील धार्मिक उपक्रमांवर निर्बंध आणण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी पशुवधासंदर्भात एक अधिसूचना जारी केली. आता बंगालमधील नागरिकांना आपल्या इच्छेनुसार गाय, बैल, म्हैस किंवा वासरांची कत्तल करता येणार नाही. पश्चिम बंगाल सरकारने ‘पश्चिम बंगाल पशुवध नियंत्रण अधिनियम, १९५०’ची कठोर अंमलबजावणी ..

कधी काळी जिथे होता डाव्यांचा पगडा तिथेच भरवली संघाची शाखा!

पश्चिम बंगालमधील डाव्या विचारांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जाधवपूर विद्यापीठात मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रभात शाखा पार पडली. राज्यात पहिल्यांदाच भाजप सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे. जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांवर नेहमीच डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लागलेली संघाची ही शाखा बंगालमध्ये संघाच्या लक्षणीय उत्थानाचे संकेत देत आहे. राज्यातील संघाच्या शाखांची संख्या २०१२ मधील १,३५० वरून वाढून २०२६ मध्ये ४,३२५ झाल्याचे ..

बंगालमधील 'भगव्या लाटे'मुळे बांग्लादेशात खळबळ! सीमाबंदीच्या निर्णयाने कट्टरपंथीयांमध्ये कमालीची अस्वस्थता

पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्यानंतर बांग्लादेशमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी बंगालमधील नव्या सरकारविरोधात रस्त्यावर आंदोलन सुरू झाले आहे, तर काही कट्टरपंथी मौलवी राज्याचे नवे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांना उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. केवळ कट्टरपंथी मौलवीच नव्हे, तर बांग्लादेश सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर असलेले काही अधिकारीदेखील या घडामोडींमुळे अस्वस्थ असल्याचे दिसत आहे...

निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर पालिकेचा बुलडोझर! महापालिकेच्या कारवाईचे स्थानिक महिलांकडून स्वागत

छत्रपती संभाजीनगर येथील एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर बुधवारी बुलडोझरची कारवाई करण्यात आली. अवैध बांधकामाच्या प्रकरणात महानगरपालिकेकडून सदर कारवाई करण्यात आली. नाशिकच्या कॉर्पोरट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. मतीन पटेल यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर ९ मे रोजी महानगरपालिकेने अवैध बांधकामाबाबत नोटीस बजावून ७२ तासांत उत्तर मागितले होते...

ब्रिटिश राजवटीतही भारत हिंदूराष्ट्रच! : दत्तात्रेय होसबाळे

आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करत नाही आहोत, भारत आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे. ब्रिटिश राजवटीतही हे हिंदू राष्ट्रच होते. हिंदू राष्ट्राचा अर्थ सांस्कृतिक ओळख असा आहे, धार्मिक राज्य असा नाही. राष्ट्रीयत्व एकच असल्यामुळे आम्ही कुणालाही वेगळे मानत नाही. भारतात मुस्लीमांना दुय्यम नागरिक समजले जात नाही. सरकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत असून संघ सुद्धा सातत्याने अल्पसंख्याक समाजातील नेत्यांशी संवाद साधत असतो.” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले...

आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाविश्वातून अनेकांची हजेरी

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट तसेच संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ११ एप्रिल २०२६ रोजी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील Breach Candy Hospital येथे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली होती, मात्र त्यांची नात जनाई भोसले हिने नंतर स्पष्ट केले की, आशा ताईंना छातीमध्ये संसर्ग झाला होता. उपचार सुरू असतानाच १२ एप्रिल रोजी त्यांचे मल्टिपल ऑर्गन ..

Konkan Ratnagiri Petroglyphs :कोकणातील कातळशिल्पांबद्दल ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर!

(Konkan Ratnagiri Petroglyphs): कोकणातील कातळशिल्पं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अनमोल ठेवा. रत्नागिरी जिल्ह्यातील २५ किमी परिसरात पसरलेल्या २००० हून अधिक कातळशिल्पांवर जागतिक दर्जाचा माहितीपट तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १४.५० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली...

पुरस्कार सोहळ्यात राजपालच्या कर्जावरुन खिल्ली, सलमानने पाठिंबा देत केली पाठराखण

प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) मागच्या काही दिवसांपासून त्याच्या थकित कर्जामुळे चर्चेत राहीला आहे. त्याने पोलीसांकडे आत्मसमर्पणही केलं होतं. पण त्यानंतर त्याला जामिन मंजूर झाला. पण आता एका पुरस्कारसोहळ्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आज मंगळवारी सहकलाकार राजपाल यादवच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे. पुरस्कार सोहळ्यात झालेल्या टिप्पणीवरून राजपाल यादवच्या सुरू असलेल्या चेक बाऊन्स प्रकरणाची खिल्ली उडवली गेल्याचं मानलं जात असून, त्यानंतर ..

‘‘धुरंधर’मुळे सगळ्यांची जळते...’ कॉमेडियन झाकिर खान काय बोलून गेला

मार्च महिन्यात १९ तारखेला प्रदर्शित झालेल्या धुरंधर २ (Dhurandhar 2 The Revenge) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या १८ दिवसांत या चित्रपटाने भारतात १००० कोटी रुपयांच्या नेट कलेक्शनचा टप्पा गाठत असा विक्रम करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागापेक्षाही या सिक्वेलने मोठी झेप घेत अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत...

Dr. Jaysingrao Pawar : मराठेशाहीचा इतिहासकार काळाच्या पडद्याआड! डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

मुंबई :(Dr. Jaysingrao Pawar) आपल्या लेखणीतून मराठेशाहीचा इतिहास मांडणारे ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज दि. २६ मार्च रोजी पहाटे निधन झाले.वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ पदभर सांभाळला होता. त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधनाच्या विश्वामध्ये पोकळी निर्माण झाली आहे...

‘सरके चुनर...’चा वाद कोर्टात, नोरा फतेहीने देश सोडण्याची वकिंलांची मागणी

मागच्या काही वर्षांत अभिनेत्री आणि नृत्यांगणा नोरा फतेहीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कॅनडामध्ये जन्मलेली आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केलेली अभिनेत्री नोरा फतेही सध्या मात्र मोठ्या वादात सापडली आहे. कन्नड चित्रपट KD Devil मधील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या गाण्याच्या हिंदी आवृत्तीत अत्यंत अश्लील शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त ..

आखातात युद्धाचा भडका उडालेला असताना पंतप्रधान मोदींचा फ्रान्स राष्ट्राध्यक्षांशी संवाद! काय चर्चा झाली?

(PM Modi Emmanuel Macron Call) इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेले युद्ध आता आणखी गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे. लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर आता हे देश एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगावर ऊर्जा संकट ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारत आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांशी संवाद साधत पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेतला.(PM Modi Emmanuel Macron Call)..

कोण आहे मोनालिसाचा पती फरमान खान? अभिनेता म्हणूनही आहे ओळख

महाकुंभ मेळ्यादरम्यान अचानक चर्चेत आलेली मोनालिसा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अलीकडेच तिने केरळमधील एका मंदिरात अभिनेता आणि मॉडेल फरमान खान याच्यासोबत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांचा या नात्याला विरोध असल्याच्या चर्चा असल्यामुळे या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लग्नानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोघांनी केरळ पोलिस यांच्याशीही संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे...

‘द केरळ स्टोरी ३’? ‘…हा तर लव्ह जिहाद’, मोनालिसाने मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यानंतर दिग्दर्शकाने केली सनसनाटी टिका

महाकुंभ मेळ्यात माळा विकताना अचानक सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही चित्रपटामुळे किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे, तर तिच्या लग्नामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. मोनालिसाने आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. या बातम्या समोर आल्यानंतर तिला चित्रपटात लॉन्च करणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे...

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे नळबाजारातून शेकडो किलो गोमांस जप्त!

रमजान महिन्यातच मुंबईतील नळ बाजार परिसरात गोमांस आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे संशयित गोमांसाचा साठा जप्त करण्यात आला. सदर प्रकरणाची पोलिसांद्वारे चौकशी सुरु असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी माहिती आहे की, ज्यावेळी गोरक्षक घटनास्थळी पोहोचले तेव्हा धर्मांध मुस्लिमांचा जमावाने त्यांना मारहाण केली...

विजय-रश्मिकाची लगीनघाई! उदयपूरमध्ये रंगणार विवाहसोहळा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) अखेर लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम देत स्वतःच मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. मात्र आता या दोघांनी आपल्या लग्नाला अधिकृत स्वरूप देत त्याला खास नाव दिलं आहे ते म्हणजे विरोश (VIROSH) विजय आणि रश्मिका यांच्या नावापासून हे छान नाव त्यांनी आपल्या नात्याला दिलं आहे...

रणवीर सिंग खंडणी प्रकरणात मोठा खुलासा, बिश्नोई गँगच्या हॅरीची चौकशी सुरु

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याला अंडरवर्ल्डकडून धमकी दिल्याप्रकरणी मोठी खळबळ निर्माण झाली होती. तसेच बॉलिवूड आणि खंडणी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान, आता याच प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित हरिचंद्र उर्फ ‘हॅरी बॉक्सर’ याने रणवीरच्या मॅनेजरला व्हॉइस नोट पाठवत कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रणवीर सिंगची सुरक्षा देखील वाढवण्यात आली असून मुंबई क्राइम ब्रँचनं आरोपीविरुद्ध लुकआउट सर्क्युलर (LOC) जारी केला आहे...

रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ ‘या’ दिवशी होणार रिलीज

भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, 'राजा शिवाजी' या द्विभाषिक (मराठी आणि हिंदी) चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शिवाजी जयंती दिनी प्रदर्शित करण्यात आले. इतिहास साक्षी आहे त्या अढळ निष्ठेचा आणि अजेय शौर्याचा. एक अशी गाथा, जी केवळ कथा नाही तर आहे ‘एक वचन, एक स्वराज्य, एक संपूर्ण राष्ट्राचा अभिमान’...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष : १९५२ ते २०२६मध्ये आलेले उत्तम चित्रपट, मालिका पाहिल्यात?

१९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा मानला जातो. याच दिवशी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा केवळ उत्सव नसून स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागवणारा दिवस आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, व्याख्याने आणि अभिवादन सोहळे आयोजित केले जातात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेची गाथा मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्..

जनहिताचा विचार करून मतदान केले पाहिजे : सरसंघचालक

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत डॉ. मोहनजी भागवत यांनी बजावले मतदानाचे कर्तव्य..

West Bengal SIR : पश्चिम बंगालमध्ये ५८.२० लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने मसुदा यादी केली जाहीर

मुंबई : (West Bengal SIR) निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (West Bengal SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पश्चिम बंगालची २०२६ ची प्रारूप मतदार यादी मंगळवारी जाहीर केली. या प्रक्रियेमुळे राज्यातील ५८.२० लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असून, त्यामुळे मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (West Bengal SIR) पूर्वी ७ कोटी ६६ लाख ३७ हजार ५२९ असलेली मतदारसंख्या आता ७ कोटी ०८ लाख १६ हजार ६३१ वर आली आहे...

Kumbh Mela Nashik 2027 : झाडाला मिठी मारता, तसं बकरीला का मिठी मारत नाही?, राणेंचा सवाल

मुंबई : (Kumbh Mela Nashik 2027)नाशिकमध्ये २०२७ ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभेमळ्याच्या तयारीला वेग आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला येणाऱ्या साधू-महंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरात तयार करण्यात येणाऱ्या साधूग्राममुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साधुग्राम उभारणीसाठी तपोवन परिसरात ११५० एकरावरील १८०० झाडे तोडण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी ग्रीन मार्किंग सुरू करण्यात आलं आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. या संवेदनशील मुद्द्याने तात्काळ ..

बहुपत्नीत्व पद्धतीला अखेरचा ब्रेक! आसाम सरकारचे मोठे पाऊल

आसाम सरकारने राज्यात बहुपत्नीत्वावर पूर्णतः बंदी घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. गुरुवारी आसाम विधानसभेत बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक (प्रोहिबिशन ऑफ पॉलिगॅमी बिल २०२५) मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या मंजुरीनंतर आसाम हे देशातील पहिले असे प्रमुख राज्य ठरले आहे, ज्याने बहुपत्नीत्वाला थेट दंडनीय गुन्हा घोषित केले आहे. सरकारचा दावा आहे की हा कायदा महिलांच्या विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी ऐतिहासिक ठरेल...