एकविसाव्या शतकात पुस्तक महोत्सवसारखे उपक्रम महत्वाचे : मंत्री सुधीर मुनगंटीवार

    20-Dec-2023
Total Views |
Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar

पुणे :
एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली.

यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, राज्य मराठी विकास संस्थेचे माजी प्रभारी संचालक प्रा. आनंद काटीकर आदी उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून या भव्य आयोजनाबद्दल राजेश पांडे यांचे कौतुक केले. त्यांनी पांडे यांच्याकडून महोत्सवात झालेल्या गिनीज विश्वविक्रमाचीही माहिती घेतली.