मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप हे इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. भारतीय ट्रॅव्हल्स कंपन्यांनादेखील लक्षद्वीपबाबत विचारणा करण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट देण्यासाठी पहिली पसंती दर्शवली आहे. तसेच, भारतीयांनी मालदीव येथे पर्यटनाला जाण्यासाठी काढलेली तिकीटेदेखील यादरम्यान रद्द केल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव आणि भारत या दोन्ही देशांमध्ये वादंग निर्माण झाले होते. त्यातच मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे मालदीवच्या पर्यटनावर भारतीयांकडून बहिष्कार टाकण्याच्या चर्चांना उधाण आले. एकंदरीत, भारतीयांन मालदीवपेक्षा लक्षद्वीपला फिरायला जाणे पसंत करत आहेत. एकूणच, लक्षद्वीप हे ठिकाण सर्वाधिक सर्च झाल्याने गेल्या २० वर्षांतील रेकॉर्ड मोडला आहे.