मुंबई : सणासुदीच्या काळात अनियंत्रित आहार केंद्रस्थानी असतो आणि या करिता नर्चर हेल्थ सोल्युशन्स च्या संस्थापिका व सफोला न्युट्रिशन पार्टनर (सफोला पोषण भागिदार), नोंदणीकृत आहार तज्ञ शेरिल सॅलिस, प्रत्यक्षात करण्याजोगे आणि सहजपणे अनुसरण करता येणारे उपाय सुचवतात जे तुम्हाला सणानंतर विषारी द्रव्यांपासून शरीरशुध्दी करण्यात मदत करू शकतात. या सोप्या आणि सातत्यपूर्ण पायऱ्यांचे दररोज पालन करून तुम्ही अतिसेवनाच्या त्या काळानंतर एक अधिक निरोगी जीवनशैलीचा पुन्हा प्रारंभ करू शकता. सणांनंतर तुम्हाला यशस्वीपणे विषारी द्रव्यांपासून शरीरशुध्दी करण्यात मदत करू शकणारी अशी सहा अत्यंत प्रभावशाली व सोप्या पायऱ्या खाली दिल्या आहेत.
खाद्यपदार्थ वाढण्याच्या आकारावर लक्ष द्या
सणासुदीतील मेजवान्यांचा आनंद उपभोगल्यानंतर तुमच्या सामान्य स्थितीत जाण्याच्या प्रवासाठी एक चांगला प्रारंभबिंदु म्हणजे तुम्ही ताटात किती वाढून घेता यावर लक्ष ठेवणे. लहान प्लेट निवडून तुम्ही अन्नाची मात्रा कमी करू शकता, उदा: १२-इंचाच्या प्लेट ऐवजी ९-इंचाची प्लेट वापरा. या सोप्या तडजोडीमुळे खूप जास्त वाढून घेण्याच्या वृत्तीवर आळा घालण्यात मदत होते. वाढून घेण्याच्या मात्रेचे मार्गदर्शक म्हणून प्लेटचा वापर करा- अर्धी भाज्यांनी, चतकोर प्रोटीनने आणि उरलले धान्यांपासून बनलेल्या पदार्थांनी भरा. जेवण सुरू करण्यापूर्वी थोड्याश्या पाण्याचा घोट घ्या- खरीखुरी भूक आणि नुसतीच तहान यातील फरक जाणण्यात हे मदत करते. तसेच, अन्न सावकाश चावा आणि प्रत्येक घासाकडे लक्ष देत त्याच्या चवीचा आनंद घ्या.
धान्य असलेले पर्याय निवडा
सणासुदीत अतिसेवन केलेले खाद्यपदार्थ आणि मिठाया यांच्या दुष्प्रभावांपासून बाहेर पडण्याचा आणखी एक उत्तम उपाय म्हणजे गहू, दलिया किंवा ज्वारी सारख्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा तुमच्या जेवणात वापर करणे. या धान्यांत तंतूमय द्रव्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात आणि ही तुमच्या भूकेची भावना कमी करण्यात मदत करतात व तुम्हाला पोट भरले आहे अशी भावना अधिक काळ देतात. स्मूदीज किंवा स्मूदी बाऊल्समध्ये ओट्स घालून कल्पक बना. मैद्यापासून बनलेल्या पर्यायांपेक्षा पूर्ण गव्हाचे व्रॅप्स पसंत करा आणि कटलेट्सवर कोटिंग देण्यासाठी ब्रेडचा चुरा किंवा रवा या ऐवजी भरड दळलेले ओट्स वापरा. हे सोपे बदल सणासुदीच्या दिवसात लागलेली अतिसेवनाची सवय नियंत्रित करण्यात फक्त मदतच करतात असे नाही तर तुमच्या खाण्याच्या सवयींत पोषक तत्त्वे देखील जोडतात.
चांगले फॅट्स समाविष्ट करा आणि वाईट फॅट्स कमी करा.
सणाच्या दिवसांत सेवन केलेल्या सुखदायक परंतु प्रचंड प्रमाणात कॅलरी असणाऱ्या तळलेल्या चविष्ट पदार्थांवर उपाय करण्यासाठी एक साधा परंतु प्रभावी असा विषारी द्रव्यांपासून शरीरशुध्दीचा बदल करण्याचा विचार करा- अधिक उच्च धूम्रांक/स्मोक पॉइंट व एमयुएफए आणि पीयुएफए यांचे संतुलित संयोजन असलेली मिश्रित तेलेनिवडा. ही तेले तुम्हाला अँटिऑक्सिडंट्स देत तुमचे फक्त रक्षणच करत नाहीत तर कॉलेस्टेरॉल पातळी संतुलित ठेवण्यासाठी अधिक चांगल्या गुणधर्माचा फॅट प्रोफाइल पुरवतात. मिश्रित तेले, एकल-बी तेलांच्या तुलनेत अधिक चांगले आरोग्य लाभ देऊ करतात. आता यानंतर पुढचे पाऊल म्हणजे, तुमच्या तेलाच्या वापरावर लक्ष ठेवा. स्वयंपाक करताना, तुमच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी तुमचे तेल चमच्याने मोजा किंवा तेल अनिर्बंधपणे ओतण्याऐवजी भांड्यात तेल पसरवण्यासाठी सिलिकॉन ब्रशेश वापरा.
सोडियम आणि वरच्या साखरेच्या सेवनावर लक्ष ठेवा.
आता सणासुदीची खादाडी संपली आहे, मीठ आणि अतिरिक्त साखरेच्या सेवनावर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. सॅलेडवर घालण्यासाठी मीठ किंवा चाट मसाला ऐवजी लिंबाचा रस पिळण्याचा प्रयत्न करू शकता. सोडियमच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चिंच, कोकम आणि आमचूर पावडर मदत करू शकतात. डबाबंद प्रक्रिया केलेल्या पर्यायांऐवजी ताजे मांस निवडा आणि लोणची, पापड किंवा चटण्या यांचा मर्यादित प्रमाणात आनंद घ्या.
सणासुदीतील विविध प्रकारच्या मिठाया व मिष्टान्नांत घातलेल्या अतिरिक्त साखरच्या सेवनावर आता सणासुदीनंतरच्या काळात त्वरित कपातीची गरज आहे. आपल्या अन्नात नैसर्गिक स्वरूपात उपस्थित नसलेली, वरून घातलेली साखर कोणत्याही प्रकारचे पोषक द्रव्य पुरवत नाही. नैसर्गिक साखर असणारे खाद्यपदार्थ पर्याय निवडा किंवा तुम्हाला अजूनही गोड खाण्याची ओढ लागत असेल तर कमी साखर असलेले पर्याय निवडा. उदा: डबाबंद फळांच्या रसांऐवजी ताजी फळे पसंत करा, चहात साखर कमी करा आणि सुगंधी दह्याऐवजी साधे दही निवडा. "अतिरिक्त साखर" असे लेबल असलेल्या डबाबंद अन्नपदार्थावर नजर ठेवा किंवा ’ose(ओज)' ही अक्षरे शेवटी असलेले घटक असल्यास - उदा: सॅक्रोज, डेक्स्ट्रोज, फ्रुक्टोज यांवर लक्ष ठेवा आणि अशा अन्नपदार्थांच्या सेवनावर मर्यादा ठेवा/ते टाळा. तसे पाहू गेल्यास लहान वाटणारे हे उपाय अधिक निरोगी जीवनशैली निवडण्यावर लक्षणीय स्वरूपात चांगला प्रभाव करू शकतात.
कमी-फॅट (लो-फॅट) असणारी प्रथिने निवडा.
सणानंतरच्या काळजीचा भाग या नात्याने तुमच्या आहारात अधिक प्रथिन व कमी फॅट यांचा समावेश असणाऱ्या प्रथिनांचा उपयोग करा. चिकन ब्रेस्ट, मासे, अंडी आणि दूध, दही व पनीर या सारख्या कमी फॅट असणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांचा पर्यायी विचार करा. सोया, कडधान्ये व डाळी, भाजलेले चणे आणि उकडलेले मोड या सारखी वनस्पतीजन्य प्रथिने देखील उत्तम पर्याय आहेत. तुमच्या जेवणाच्या ताटातील एक चतुर्थांश भागात प्रथिन-समृध्द अन्नपदार्थ समाविष्ट आहेत याची खात्री करा. प्रथिनांचा कोणताही स्त्रोत जोडण्याने स्वादिष्ट व आरोग्यपूर्ण भोजनात फक्त मदत होईल असे नाही तर त्यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय रहाल आणि तुमची त्वचा व केस देखील सुधारतील. हे लाभ फक्त सणाच्या दिवसांनंतरच अंगिकारण्यासारखे नसून ते वर्षभर अंगिकारण्याजोगे आहेत.
शारिरीक हालचाल वाढवा.
सणातील मेजवान्यांच्या अतिरेकापासून अधिक चांगल्या प्रकारे मुक्त होण्याचा आणखी एक उपाय म्हाणजे तुमच्या दिनचर्येत काही शारिरीक हालचाल समाविष्ट करणे. लहान प्रमाणात शिस्त अंगिकारण्याने, उदा; आठवड्यातील किमान पाच दिवस 30-60 मिनिटे मध्यम प्रमाणात शारिरीक व्यायाम केल्याने लक्षणीय फरक पडू शकतो. फेरफटका मारा, लिफ्ट ऐवजी जिना वापरा किंवा फोनवर असताना काही वेळ चाला. तुमच्या कामाच्या जागी सर्वात जवळच्या बस स्टॉप किंवा स्टेशनहून चालत जाऊन तुमच्या कामावर जाण्याचा प्रवास लघु व्यायामात परिवर्तित करा. कमी बसण्याचे ध्येय ठेवून दर तासाला अर्धविराम घेत काही मिनिटे हालचाल करा. या लहान सवयी तुमच्या ऊर्जेचा स्तर उंचावण्यात मदत करतील आणि तुम्हाला दिवसभर उत्साहित आणि ताजेतवाने ठेवतील.