क्रिकेट सामन्यानंतरही रुमवर ऑफिसचं काम करतो..बहिणीने केला खुलासा!

    14-Jun-2024
Total Views | 26
netravalkar sister
 

नवी दिल्ली :      भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. दरम्यान, सामना यजमान संघाला गमवावा लागला असला तरी सामन्यावेळी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर याच्यावर खिळल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता युएसए संघाचा एक भाग असलेल्या सौरभविषयी नवी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सौरभ नेत्रावळकरची बहीण निधीने त्याबद्दलचा नवा खुलासा केला आहे. सौरभ नेत्रावळकर पेशाने सॉफ्टवेअर इंजीनियर असून त्याला पूर्णवेळ अभियंता म्हणून कार्यरत राहण्याव्यतिरिक्त एक क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द करण्यासाठी ओरॅकल कंपनीचा मोठा पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.

निधी यांनी म्हटले की, सौरभ त्याच्या क्रिकेट सामन्यादरम्यानही कंपनीच्या कामासाठी लॅपटॉप घेऊन जातो. तसेच, क्रिकेट सामना खेळूनही सौरभ त्यानंतर हॉटेल रुममध्ये काम करतो असेही तिने सांगितले आहे. युएसए संघाचा पुढील सामना १४ जून रोजी आयर्लंडविरुध्द असणार आहे. या सामन्यात युएसए संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यानंतर युएसए संघ सुपर ८ साठी क्वालिफाय होऊ शकतो.







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121